Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘येणार तर मोदीच!!’ ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांच्या ट्विटला अनुपम खेर यांचे प्रत्युत्तर, होतायत जोरदार ट्रोल

‘येणार तर मोदीच!!’ ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांच्या ट्विटला अनुपम खेर यांचे प्रत्युत्तर, होतायत जोरदार ट्रोल

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. अशा परिस्थितीत खरंतर संपूर्ण जनतेने एकत्र येऊन या संकटाचा सामना करायला पाहिजे. आता अशात अनेकजण एकमेकांवर आरोप लावत आहेत. सरकार म्हणतयं की, नागरिकांनी नियम पाळले नाही म्हणून ही वेळ आली आहे. दुसरीकडे नागरिक म्हणतायेत की सरकारने नीट सोयी सुविधा पुरवल्या नाहीत म्हणून या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पण खरंच एकमेकांची उणीधुणी काढायची ही वेळ आहे का??

अशातच ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी कोरोना संकटाबाबत सरकारला दुषणे देत एक ट्वीट केले आहे. या ट्विटवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी शेखर यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे, जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यासोबतच ते ट्रोलही होत आहेत.

पत्रकार शेखर गुप्ता यांनी 25 एप्रिलला ट्विट केले होते की, “60 च्या दशकात जन्म झाला असल्याने मी अनेक संकटं खूप जवळून पाहिली आहेत. तीन युद्ध, अन्न धान्याचा तुटवडा, विभाजनानंतर आता आलेलं हे भारतासाठी सगळ्यात मोठं संकट आहे. पण सरकारला याआधी कधीच असं पाहिलेलं नाही. इथे कॉल करायला कोणता कंट्रोल रूम नाहीये, तर कोणाशी आणि काय बोलावं हे सुद्धा कळत नाहीये.”

त्यांच्या या ट्विटला अभिनेता अनुपम खेर यांनी उत्तर देताना लिहिले आहे की, “आदरणीय शेखर गुप्ता जी!! हे जरा जास्तच झालं. तुमच्या स्टँडर्सपेक्षाही अधिक. कोरोना हे संपूर्ण देशासाठी एक आपत्ती आहे. आपण या महामारीचा सामना याआधी कधीच केला नाहीये. सरकारबाबत चर्चा जरूर करा. त्यांना प्रश्न करा. पण या परिस्थितीचा सामना करणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. तसं घाबरु नका. येणार तर मोदीच!! जय हो!”

त्यांच्या या ट्वीटनंतर अनुपम खेर ट्रेंड होत आहेत. अनेक जण त्यांना ट्रोल करत आहेत. एका युजरने अनुपम खेर आणि सोनू सूदच्या ट्विटरवरील फॉलोवर्सचा स्क्रीनशॉट शेअर केला.

त्यात अनुपम यांना १८.६ मिलियन फॉलोवर्स आहेत, तर दुसरीकडे सोनूला ६.१ मिलियन फॉलोवर्स असल्याचे दिसत आहे.

 

याव्यतिरिक्तही अनेक ट्वीट व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारनंतर आता पत्नी ट्विंकल खन्नाही आली कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून, थेट यूकेवरून मागवणार १०० ऑक्सिजन कंसंट्रेटर्स

-‘वयाच्या १२ व्या वर्षापासून करतेय बॉडी शेमिंगचा सामना’, म्हणत अभिनेत्री इलियाना डिक्रूजने केले भाष्य

-‘तुम्ही भारताला कोरोना लसीचा पुरवठा करू शकता का?’ भारताची वाईट परिस्थिती पाहून प्रियांका चोप्राचे अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ट्वीट

हे देखील वाचा