प्रेमाला वयाचं बंधन नसतं, याचा प्रत्यय आपल्याला बॉलिवूड कलाकारांकडून अनेकदा आला आहे. बॉलिवूड अभिनेते किंवा अभिनेत्री त्यांच्यापेक्षा लहान मोठ्या व्यक्तीला डेट करत असतात. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान याचाही समावेश होतो. अरबाजने वयाची पन्नाशी ओलांडली आहे. तो ५५ वर्षांचा असूनही तो त्याच्यापेक्षा कमी वयाची सौंदर्यवती जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत आहे. ती ३० वर्षांची आहे. दोघांच्या वयात २५ वर्षांचे अंतर असले, तरी त्यांच्यातील बाँडिंग फारच चांगले आहे. त्यांचे नाते अरबाजचे मलायका अरोराशी घटस्फोट झाल्यानंतरपासून चर्चेत आहे. जॉर्जिया तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
सध्या अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) हिचा एक बोल्ड व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती तिच्या अदा दाखवताना दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
हद्द केली पार
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत जॉर्जिया ब्रा परिधान करून कॅमेऱ्यापुढे आपल्या अशा अदा दाखवत आहे की, तिला पाहून चाहते आऊट ऑफ कंट्रोल होत आहेत. व्हिडिओत जॉर्जिया पूलच्या किनाऱ्यावर आपल्या कातिलाना अदांचा जलवा दाखवत आहे.
फ्लॉन्ट केला फिगर
जॉर्जिया या व्हिडिओत ब्रासोबतच थाय स्लिट स्कर्टमध्येही दिसत आहे, जी वरच्या दिशेने खोचत तिने कॅमेऱ्यापुढे पोझ देत आहे. या व्हिडिओत जॉर्जिया तिच्या अदांचा जलवा दाखवत आहे. तिला पाहून चाहतेही बेधुंद झाले आहेत. अभिनेत्रीने या व्हिडिओत लाईट मेकअप केला असून तिचे केस मोकळे सोडले आहेत. जॉर्जियाने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर ४० हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच, पाचशेहून अधिक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “तू एकदम चॉकलेटसारखी दिसत आहेस.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “मी तुझाच विचार करतोय.” आणखी एकाने कमेंट केली की, “दिवसेंदिवस कशी काय एवढी सेक्सी होत आहेस डार्लिंग.” याव्यतिरिक्त अनेक चाहते तिला ‘ब्युटीफूल’ आणि ‘हॉट’ म्हणत आहेत.
View this post on Instagram
शाहबाजच्या नवीन गाण्याच्या लाँचसाठी हजर
काही दिवसांपूर्वी जॉर्जिया ही शहनाज गिल हिचा भाऊ शाहबाजच्या गाण्याच्या लाँचिंग सोहळ्याला पोहोचली होती. यादरम्यान शहनाज आणि जॉर्जियाने कॅमेऱ्यापुढे खूप डान्स केला होता. यादरम्यान जॉर्जियाने पिवळ्या रंगाची ब्रालेट स्टाईलची टॉप परिधान केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म, श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशीच दिली चाहत्यांना गुड न्यूज
व्हायरल व्हिडिओनंतर करणसिंग ग्रोवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; म्हणाले, ‘तो बायकोच्या जिवावर जगतो…’
बाहुबलीचे लेखक काढणार ‘आरएसएस’वर वेबसिरीज; घोषणा करत म्हणाले, ‘RSS ने गांधींना…’