Tuesday, December 23, 2025
Home टेलिव्हिजन अडचणीत आलाय अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामीचा संसार? अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अडचणीत आलाय अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामीचा संसार? अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अर्जुन बिजलानीचे (Arjun Bijlani) नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने त्याने मनोरंजन क्षेत्रात स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. अर्जुन बिजलानी त्याच्या अभिनयाइतकाच वैवाहिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. अलिकडेच अर्जुन आणि त्याच्या पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या  होत्या. याबाबत आता अर्जुनने मोठा खुलासा केला आहे. 

छोट्या पडद्यावर झळकणारी सगळ्यात प्रेमळ जोडी म्हणून अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी यांचे नाव घेतले जाते.  अर्जुन आणि नेहा यांची लवस्टोरीही खूपच सुंदर आहे. दोघांचेही अनेक वर्ष अफेअर सुरू होते. त्यानंतर २०१३ मध्ये दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या दोघेही स्मार्ट जोडी या कार्यक्रमात झळकत असून, त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. त्यांची जोडी या नावाप्रमाणेच सगळ्यात स्मार्ट जोडी म्हणूनच चर्चेत असते.  मात्र त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आले होत्या. आता यावर अर्जुनने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दलचे स्पष्टिकरण दिले आहे.

अर्जुन बिजलानीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकांउटवरुन दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “हे प्रेम कायमचे आहे. मागच्या पोस्ट आणि त्यासंबंधीच्या अफवांचा आमच्या आयुष्याशी काही संबंध नाही. काल मला खूप संदेश आले, फोन आले त्यासाठी मी खूप आभारी आहे. लोक आमची इतकी काळजी करतात हे पाहून आनंद झाला.” त्यामुळेच अर्जुन आणि नेहाच्या दुराव्याच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा