Saturday, July 6, 2024

अर्जुन कपूरच्या ताफ्यात आणखी एका आलिशान गाडीचा समावेश; तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये घेतली मर्सिडीज कार

मोठ- मोठ्या आणि महागड्या गाड्या आपल्याकडे असाव्यात, असे प्रत्येकालाच वाटत असते. वेगवेगळे वैशिष्ट्य असलेल्या अनेक चार चाकी आणि दोन चाकी गाड्या बाजारात आहेत. दरवर्षी प्रत्येक कंपनी आपल्या गाड्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये बदल करत असते. येणाऱ्या नवीन मॉडेलची किंमत ही आधीच्या मॉडेलपेक्षा जास्तच ठेवली जाते. अशात ‘ऑडी’, ‘बीएमडब्लू’, ‘मर्सिडीज बेंझ’ या गाड्यांची किंमत कोटींच्या घरात असते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती या गाड्या घेण्याची फक्त स्वप्नेच पाहू शकतात. अशा महागड्या गाड्या घेण्याचे अभिनेता अर्जुन कपूरचे देखील स्वप्न होते. ते त्याने पूर्ण देखील केले आहे.

अर्जुनला नवीन महागड्या गाड्या खूप आवडतात. त्याच्याकडे बऱ्याच महागड्या गाड्यांची यादी आहे. मोठा ब्रँड असलेल्या कंपनीची प्रत्येक नवीन गाडी त्याच्या दारी असतेच असते. सध्या त्याने ‘मर्सिडीज मेबॅक एसयूव्ही’ ही गाडी घेतली आहे. या गाडीची किंमत तब्बल अडीच कोटी रुपये एवढी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ‘लँड रोव्हर डिफेंडर ११०’ घेतली होती. या गाडीची किंमत १ कोटी रुपये एवढी आहे. अर्जुनची ‘मर्सिडीज मेबॅक एसयूव्ही’ ही गाडी त्याने मुंबईच्या एका डीलरकडून घेतली आहे. अर्जुनला लेटेस्ट कार ब्रँड वापरणारा अभिनेता म्हणून देखील ओळखले जाते. (Actor Arjun kapoor has bought 2 crore 43 lakh rupees Mercedes Maybach SUV pic gone viral on social media)

अर्जुनच्या महागड्या गाड्यांमध्ये ‘मासेराती लेव्हन्ट’ ही गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास १.५३ कोटी रुपये एवढी आहे. तसेच त्याच्याकडे ‘ऑडी क्यू५’ ही गाडी असून या गाडीची किंमत ५६ लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त त्याच्याकडे ‘वोल्वो एक्ससी९० टी८ एक्सिलेन्स’ गाडी असून या गाडीची किंमत १.३१ कोटी रुपये आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे ‘होंडा’ सीआर-व्ही’ ही दुचाकी गाडीही आहे. या गाडीची किंमत २९ लाख रुपये आहे. यामध्ये आणखी एका गाडीचा समावेश आहे तो म्हणजे, ‘मर्सिडीज जीएलएस ३५०डी ४मॅटीक’ होय. या गाडीची किंमत ८७.७६ लाख रुपये आहे. आता नुकत्याच त्याच्या गाड्यांमध्ये दोन नवीन गाड्यांची भर पडली आहे.

‘मर्सिडीज मेबॅक एसयूव्ही’ २०२१मध्ये या गाडीचे ५० युनिट लॉंच करण्यात आले आहे. यातील एक अर्जुनकडे आहे. गाडी बाजारात आल्यापासून तिच्या सर्व युनिटचे बुकिंग झाले आहे. यावर्षी जर कोणी ही गाडी बुक केली, तर त्याला ती २०२२मध्ये मिळेल. नुकतेच रणवीर सिंगने देखील ही गाडी खरेदी केली आहे. ही गाडी बऱ्याच अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. या गाडीची लांबी ४ मीटर एवढी आहे. तसेच ० ते १०० किलोमीटरचे अंतर ४.९सेकंदामध्ये कापते, तर सर्वात जास्त वेग ताशी २५० किलोमीटर आहे.

अर्जुनने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटांमध्ये घवघवीत यश कमावले आहे. अशात तो चित्रपटसृष्टीमध्ये यशस्वी चित्रपट देणारा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. तो आपल्या एका चित्रपटासाठी ५ ते ७ कोटी एवढे मानधन घेतो. त्यामुळेच तो आपल्या महागड्या गाड्यांची आवड जोपासत आहे. सध्या त्याच्या नवीन गाड्यांसह त्याच्या अफेरबद्दल देखील चर्चा सुरू आहे. मलायका अरोरा या अभिनेत्रीबरोबर त्याचे अफेअर सुरू आहे. त्या दोघांनी एकमेकांबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत. मलायकाचे साल १९९८मध्ये सलमान खानचा भाऊ अरबाज खानबरोबर लग्न झाले होते. त्यानंतर मतभेद होत असल्याने त्यांनी २०१७मध्ये घटस्फोट घेतला. बऱ्याच दिवसांपासून ती अर्जुनला डेट करत आहे. त्यांच्या चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागलेली आहे. परंतु अद्याप दोघांनीही यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

-‘लक्ष वेधण्यासाठी कपडे काढणे, हा माझा अजेंडा नाही’, म्हणत निया शर्माने ट्रोलिंगवर सोडले मौन

हे देखील वाचा