Tuesday, October 28, 2025
Home बॉलीवूड अर्जुन कपूरने शेअर केला शर्टलेस फोटो, शानदार बॉडीसाठी अभिनेता जिममध्ये गाळतोय घाम

अर्जुन कपूरने शेअर केला शर्टलेस फोटो, शानदार बॉडीसाठी अभिनेता जिममध्ये गाळतोय घाम

बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर विशेषतः चित्रपटातील अभिनयासाठी, तसेच त्याच्या ऍक्शनसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याच्या फिटनेसच्या पोस्ट पाहून चाहत्यांचा उत्साह वाढतो. तसेच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. अर्जून त्याच्या आणि मलायका अरोराच्या अफेअरमुळे देखील सतत चर्चेत असतो. मलायका प्रमाणेच अर्जुन कपूर देखील सध्या त्याच्या फिटनेसवर खूप लक्ष देत आहे. अर्जुनने मेहनत करून आणि तासभर जिममध्ये घाम गाळून खूप वजन कमी केले आहे. त्याचे ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. अर्जुनच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी त्याचे खूप कौतुक केले जात आहे.

अर्जुनने मंगळवारी खुलासा केला की, शेवटी त्याने आपले ध्येय साध्य केले आहे. इंस्टाग्राम हँडलवर त्याने काही स्टोरी शेअर केल्या आहेत. त्यामध्ये तो म्हणाला की, शेवटी त्याचे ऍब्स आता दिसत आहेत. पहिला व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बिस्किट तर आली, आता चहा आणा जरा.” (बिस्किट आ गए वापस अब चाय लाना जरा.)

दुसऱ्या बूमरॅंग व्हिडिओमध्ये अर्जुन त्याच्या जबरदस्त बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो शर्टलेस दिसत आहे आणि त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन बॉडीची एक झलक चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यासह अर्जुनने कॅप्शन लिहिले की, “बिस्किटांचे पूर्ण पॅकेट तयार आहे, आता भावांनो … तर मग पार्टी करूया?”

तिसरी स्टोरीमध्ये एक मोनोक्रोम मिरर सेल्फी शेअर केला आहे. ज्यात अभिनेता पुन्हा एकदा शर्टलेस दिसला. यात तो त्याच्या जिममध्ये ट्रेडमिलजवळ उभा आहे. फोटो शेअर करत अर्जुनने कॅप्शन लिहिले की, “दुसऱ्या गोष्टीवर कोणाचीही गरज नाही, आता थोडी अतिरिक्त मेहनत करूया.” लहानपणापासून लठ्ठपणाशी सामना करणाऱ्या अर्जुनने एक शानदार बॉडी ट्रांसफॉर्मेशन केले आहे.

अर्जुनने फिट आणि शानदार बॉडी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो त्याच्या चाहत्यांना फिटनेस गोल देत आहे. काही काळापूर्वी त्याने त्याचे डाएट आणि वर्कआउट प्लॅन त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. जिममध्ये तासनतास घाम गाळणे असो किंवा फुटबॉल खेळणे असो, अभिनेता आपल्या शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी बरेच काही करत असतो. याआधी ३६ वर्षीय अभिनेत्याने खुलासा केला होता की, त्याने जागतिक किकबॉक्सिंग चॅम्पियन ड्रू नीलसोबत मिळून स्वत: ला योग्य बॉडी टाईप मिळवण्यासाठी प्रेरित केले होते आणि फिटनेसबद्दलची त्याची प्रतिबद्धता दिसून येऊ लागली आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं, तर अर्जुन कपूर शेवटच्या वेळी ‘भूत पोलिस’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिसही महत्त्वाच्या भूमिकेत होते. अर्जुन आता मोहित सुरीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानीसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा