Friday, November 22, 2024
Home टेलिव्हिजन रामायण फेम अरुण गोविल यांनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार, फॅन्सने केल्या एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स

रामायण फेम अरुण गोविल यांनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार, फॅन्सने केल्या एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत ‘राम’ ही भूमिका साकारून घरात पोहचलेले प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. ते सतत त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. ‘रामायण’ या मालिकेने त्यांना ना भूतो न भविष्यती अशी मोठी ओळख दिली. या मालिकेनंतर आजही त्यांना राम म्हणूनच ओळखले जाते. अरुण गोविल यांनी नुकतीच एक मोठी खरेदी केली आहे, ज्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

अरुण गोविल आणि नुकतीच एका आलिशान अशी मर्सिडीज गाडी खरेदी केली आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. याचा एक छोटासा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यानी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून गाडी घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या शुभेच्छांसोबतच त्यांचे काही फॅन्स त्यांची टांग देखील खेचताना दिसत आहे.

अरुण गोविल यांनी राम ही भूमिका साकारल्यानंतर लोकांनी त्यांना राम हीच उपाधी दिली. लोक अगदी देवासारखीच त्यांची पूजा करू लागले. रस्त्यात कुठेही त्यांना पाहिले की त्यांना नमस्कार करणे. आपल्या समस्यांवर त्यांच्याकडून उत्तरं देखील मागितले जातात. आता अरुण गोविल अर्थात राम यांनी गाडी खरेदी केल्यानंतर त्यावर भन्नाट आणि मजेशीर कमेंट्स आल्या आहेत. अरुण गोविल यांनी शेअर केलेल्या १५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये त्यांची पत्नी श्रीलेखा गोविल आणि ते गाडीचे कव्हर काढताना दिसत आहे. त्यानंतर शोरुमचे मॅनेजर त्यांना गाडीची चाबी देताना दिसतात. मग काही फोटो दिसतात ज्यात त्यांची पत्नी गाडीची पूजा करताना दिसते तर एका फोटो अरुण गोविल पोज देताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना अरुण गोविल यांनी लिहिले, “प्रभूच्या कृपेने कुटुंबात नवीन वाहनाचा प्रवेश झाला आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाहिजे.” त्यानंतर लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या शुभेच्छा देताना अनेकांनी त्यांच्या रामाच्या भूमिकेशी साधर्म्य असणाऱ्या मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

तत्पूर्वी १९८० साली रामानंद सागर यांच्या पौराणिक मालिकेने अर्थात रामायणने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली. अरुण गोविल यांच्यासोबतच सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या शोने या तिघांना देवाचा दर्जा दिला. २०२० साली जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन लागले तेव्हा ही मालिका पुन्हा सुरु झाली तेव्हा देखील या मालिकेने अमाप लोकप्रियता मिळवली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा