बॉलिवूडच्या जगातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेता अरुण वर्मा (Arun Verma) यांचे भोपाळ येथे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील पीपल्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अभिनेत्याने गुरुवारी (२० जानेवारी) अखेरचा श्वास घेतला. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्याशिवाय अरुण वर्मा यांनी अनेक मोठ्या स्टार्ससोबत ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
कवी उदय दहियाने दिली माहिती
अरुण वर्माच्या निधनाची माहिती कवी उदय दहिया (Uday Dahiya) यांनी दिली. त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांनी लिहिले, “अत्यंत दु:खाने कळवत आहे की, माझे मित्र अभिनेते अरुण वर्मा यांचे आज सकाळी भोपाळ येथे निधन झाले आहे, ईश्वर त्यांना त्यांच्या चरणी स्थान देवो. ओम शांती शांती शांती….” उल्लेखनीय म्हणजे अरुण वर्मा हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे ते त्यांच्या मूळ निवास भोपाळमध्ये राहून उपचार घेत होते. (actor arun verma passed away)
अरुण वर्मा यांचे चित्रपट
अभिनेता अरुण वर्मा सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटात दिसले होते. अरुण हे प्रसिद्ध नाट्य कलाकार बव कारंत यांचे शिष्य आहेत. बव कारंथ यांच्याकडून रंगभूमीचे धडे घेऊन ते मुंबईत आले होते. त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘डकैत’ या चित्रपटातून झाली. ज्यामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत होता. याशिवाय अरुणने ‘हिना’, ‘खलनायक’, ‘प्रेम ग्रंथ’, ‘नायक’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘हिरोपंती’सह ८० चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा :