Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड ‘अनेक’ सिनेमा पाहायचाय, मग थिएटर सोडा अन् ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहा, वाचा सविस्तर

‘अनेक’ सिनेमा पाहायचाय, मग थिएटर सोडा अन् ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहा, वाचा सविस्तर

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना याचा ‘अनेक’ हा सिनेमा मागील महिन्यात म्हणजेच २७ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील आयुषमानचा अभिनय यंदा चाहत्यांना आवडला नाही. अशात हा सिनेमा आता ओटीटीवरही प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला याची माहितीही समोर आली आहे.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला अनेक?
देशाच्या ईशान्येतील वाद दाखवत आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आपली जादू खेळण्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. अशात हा सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर छाप सोडण्याचा प्रयत्न करेल. नुकतेच नेटफ्लिक्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करत माहिती दिली की, ‘अनेक’ (Anek) हा सिनेमा तुम्ही ऑनलाईन सहजरीत्या पाहू शकता. या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक थ्रिलर आणि थ्रिल अनेक, अनेक आता नेटफ्लिक्सवर जारी आहे.” मात्र, अनेक सिनेमातील आयुषमानच्या अभिनयाला ट्रेड ऍनालिस्ट यांनीही पाठिंबा दिला होता. या सिनेमात आयुषमानने अंडरकव्हर पोलिसाची भूमिका साकारली होती.

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला सिनेमा
हा सिनेमा ८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. मात्र, आयुषमानचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Anek Box Office) पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. २७ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला काही खास कमाल दाखवता आली नाही. त्यामुळे आयुषमानच्या ‘अनेक’ सिनेमाला फक्त १२ कोटी रुपयांची कमाईच करता आली. हा आयुषमानच्या कारकीर्दीतील सर्वात वाईट सिनेमाही ठरल्याचे म्हटले जात आहे. खरं तर, दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि आयुषमान खुराना यांच्या जोडीला यावेळी चाहत्यांचे मन जिंकण्यात अपयश आले.

आयुषमानचे आगामी सिनेमे
आयुषमान खुराना याने सन २०१२ साली आलेल्या ‘विकी डोनर’ (Vicky Donor) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘हवाईजादा’, ‘दम लगा के हैशा’, ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘अंधाधून’, ‘बधाई हो’ यांसारख्या अनेक सिनेमात काम केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा