ज्याच्या आगमनाने सर्वांच्या आयुष्यातील संकट दूर होतात अशा विघ्नहर बाप्पाचे आज आगमन झाले असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत आहे. अनेक कलाकारांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे. कलाकार सोशल मीडियावर बाप्पासोबत फोटो शेअर करत फॅन्सला देखील त्यांच्या बाप्पाचे दर्शन देत आहेत. या फोटोंच्या माध्यमातून कलाकारांच्या घरातील आरास देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच अभिनेता भूषण प्रधान याने त्याच्या बाप्पाचे एका वेगळ्या पद्धतीने स्वागत केले आहे.
भूषण प्रधानचा त्याच्या बाप्पासोबत एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भूषण त्याच्या घरातील गणपती पुढे उभा राहिलेला दिसत असून, त्याने गणपतीसाठी पाना-फुलांची आरास करून बाप्पाची स्थापना केली आहे. अत्यंत साध्या पण सुंदर पद्धतीची त्याची आरास खूपच आकर्षक आहे. या व्हिडिओमध्ये तो शंखनाद करून बाप्पाचे स्वागत करत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भूषणने पारंपरिक वेशभूषा केली असून, त्याने कुर्ता घातलेला दिसत आहे. त्याचे बाप्पासोबत अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या घरातील बाप्पाचे दर्शन सोशल मीडियावर दाखवले आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळाल्या आहेत. (Marathi actor Bhushan pradhan’s video viral with his bappa)
भूषण हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘सतरंगी रे’, ‘चार चौघी’, ‘कोडनेम गोंद्या’ या मालिकांमध्ये काम केले आहे. या सोबत त्याने ‘तू तिथे असावे’, ‘शिमगा’, ‘रे राया’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘पारंबी’, ‘शिव्या’, ‘मिसमॅच’, ‘निवडुंग’, ‘आम्ही दोघी’, ‘ढिंचॅक’, ‘अजिंक्य’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रेमाला कोणतीही सीमा नसते! ‘या’ अभिनेत्रींनी स्वतःपेक्षा लहान वयाच्या मुलासोबत बांधली लग्नगाठ
-मराठी कलाकारांच्या घरात झाली श्रींची स्थापना, फोटो शेअर करून दाखवली बाप्पाची झलक
-मराठी कलाकारांच्या घरी झाले गणरायाचे आगमन, सुंदर फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा