अभिनेता बॉबी देओल याने पारंपारिक भूमिकांना छेद देत ‘आश्रम’ या वेबसीरिजमध्ये अनोखी व्यक्तिरेखा साकारली. ‘आश्रम’ ही वेबसीरिज चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. या वेबसीरिजचे ३ भाग प्रदर्शित झाले आहेत. या वेबसीरिजमध्ये अशा आश्रमची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये आस्थेच्या नावाखाली बेकायदेशीर कामे केले जातात. तसेच, या आश्रमात सर्वकाही ‘बाबा निराला’ यांच्या म्हणण्याप्रमाणे होत असते. मात्र, आता ही भूमिका साकारणारा बॉबी देओल पहिल्या सिझनपासूनच वादात सापडला आहे.
‘आश्रम’ (Aashram) या वेबसीरिजवर हिंदू भावनांचा अपमान आणि हिंदूंची बदनामी केल्याचा आरोप लावला गेला आहे. अशात या सर्व आरोपांवर अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. नुकतीच अभिनेत्याने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने वेबसीरिजमधील हिंदूंना बदनाम करण्याच्या आरोपावर आपले मत मांडले. तो म्हणाला की, “मी एवढंच सांगेल की, वेबसीरिज इतकी चालत असेल, तर लोकांनी ती नक्कीच पाहिली असेल. मला असे वाटते की, शोला वाईट म्हणणारे दोन किंवा तीन टक्के लोक नेहमीच असतात. प्रत्येकाचे स्वतःचे मत असते आणि लोकांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, पण आमच्या शोचे यश पाहून असे म्हणता येईल की, शोमध्ये काहीही चुकीचे नाही.”
‘आश्रम’ वेबसीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) हे आहेत. त्यांनीदेखील वेबसीरिजवरील आरोपांवर त्यांचे मत मांडले आहे. ते म्हणालेत की, “धर्मासाठी आपल्या देशात एक सुंदर म्हण आहे. लोक धर्म वाचवत नाहीत, धर्म लोकांना वाचवतो. माणूस धर्माला वाचवू शकत नाही, पण धर्म माणसाला वाचवतो. आपल्या समाजात जे काही लोक धर्म वाचवण्यासाठी बाहेर पडतात. ते सर्व गैरसमजात आहेत.”
View this post on Instagram
लवकरच येणार चौथा सिझन
बॉबी देओलच्या ‘आश्रम’ या वेबसीरिजचा तिसरा भाग यावर्षी जून महिन्यात प्रदर्शित झाला आहे. याचे नाव ‘एक बदनाम आश्रम’ आहे. सीरिजच्या तिसऱ्या भागाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलव्यतिरिक्त त्रिधा चौधरी, आदिती पोहणकर, अनुप्रिया गोयंका, चंदन रॉय सान्याल, तुषार पांडे हे सर्व मुख्य भूमिकेत आहेत. तसेच, या भागात अभिनेत्री ईशा गुप्तानेही काम केले होते.