Monday, July 1, 2024

वरुण धवनची ‘ही’ जाहिरात पाहून भडकले नेटकरी; लावला अश्लीलता पसरवण्याचा आरोप

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आजकाल त्याच्या एका व्यावसायिक जाहिरातीमुळे वादात अडकला आहे. अलीकडेच अभिनेता ‘लक्स कोझी’च्या जाहिरातीत दिसत आहे. ही जाहिरात समोर येताच तो वादात अडकला आहे. ‘अमूल माचो’ यांनी जाहिरातीचे वर्णन त्यांच्या एका जाहिरातीची कॉपी म्हणून केले आहे. कंपनीचा आरोप आहे की, वरुण धवनची ही जाहिरात त्यांच्या २००७ मध्ये आलेल्या जाहिरात टोविंग अंडरवेअर जाहिरातीसारखी आहे.

त्याचवेळी, जाहिरात पाहिल्यानंतर वापरकर्त्यांनी अभिनेता वरुण धवनलाही फटकारण्यास सुरुवात केली आहे. इंटरनेट युजर्सने वरुणच्या ‘लक्स कोझी’ जाहिरातीवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला आहे. माचो इनरवेअरचे निर्माते जेजी होसियरी यांनी जाहिरात कॉपी केल्याबद्दल लक्स इंडस्ट्रीजच्या विरोधात भारतीय जाहिरात मानक परिषदेकडे तक्रार दाखल केली आहे.

वरुण धवनवर भडकले युजर्स
एका युजर्सने अभिनेत्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत वरुणला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले की, “जर महिलेने अंतरवस्त्रांवर या पद्धतीने शूट केले असते, तर समाजाने त्याला विरोध करायला सुरुवात केली असती.”

अभिनेत्याच्या जाहिरातीला म्हटले भंगार
दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, “या लोकांना अश्लीलता पसरवण्यात लाज वाटत नाही.” त्याचवेळी, एका वापरकर्त्याने जाहिरातीच्या कलाकारांचे वर्णन ओव्हरऍक्टिंगचे दुकान म्हणून केले, तर एका युजरने वरुण धवनच्या जाहिरातीला “भंगार,” म्हटले आहे.

अमूल माचो कंपनीने तक्रार केली दाखल
तक्रार दाखल करताना अमूल माचो कंपनीने म्हटले आहे की, दोन्ही जाहिरातींमध्ये महिलेने त्याचप्रकारे अंडरवेअर पकडले आहे. एवढेच नाही, तर अंडरवेअरचा रंग आणि आकार देखील सारखाच आहे. तसेच जाहिरातीतील सहाय्यक कलाकारांच्या प्रतिक्रिया, संगीत थीम, जाहिरातीतील स्मॉल टाऊनची सेटिंग सर्व त्यांच्या जाहिरातीशी जुळत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

हे देखील वाचा