Tuesday, July 9, 2024

लता मंगेशकर यांच्या आठवणीने अभिनेते धर्मेंद्र झाले भावुक, म्हणाले ‘त्यांना एकटेपणापासून पळून…’

स्वरांची कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज गायिका लता मंगेशकर आता या जगात नाहीत. पण त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्यासोबत राहतील. त्यांच्या सुंदर गाण्यांपासून दीदींचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. लता मंगेशकर यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहते त्यांच्या निधनाच्या दु:खातून सावरले नाहीत. ते या महान गायकाची आठवण या ना त्या कारणाने करत आहेत. धर्मेंद्र यांना पुन्हा एकदा त्यांची आठवण झाली. सुमारे एक महिना कोरोना आणि न्यूमोनियाशी झुंज देत असताना रविवारी (६ फेब्रुवारी) सकाळी लताजींचे निधन झाले. लताजींना पूर्ण राज्य सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला.

लताजींच्या (Lata Mangeshkar) अखेरच्या यात्रेत देशातील तमाम मोठी माणसं सहभागी झाली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जवळचे मित्र त्यांच्याशी संबंधित अनेक किस्से शेअर करत आहेत. अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी पुन्हा एकदा त्यांची आठवण काढली आहे. त्यांनी सांगितले की, लताजींची गाणी जेव्हाही वाजत असत तेव्हा ते नेहमी थांबून ऐकायचे.

लताजींनी एकदा धर्मेंद्रसाठी गायले होते गाणे

धर्मेंद्र यांनी सांगितले की, जेव्हा लताजींनी त्यांच्यासाठी ‘आप की नजरों ने समझा’ हे गाणे गायले तेव्हा ते खूप उत्साहित झाले होते. धर्मेंद्र यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दल सांगितले होते की, “आम्ही खूप बोलायचो, विशेषत: गेल्या काही वर्षांत अनेक गोष्टी घडल्या. जणू त्यांना एकटेपणापासून दूर पळायचे होते.”

लता मंगेशकर धर्मेंद्र यांना द्यायच्या प्रेरणा 

धर्मेंद्र यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, त्यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांना कसे अस्वस्थ केले. ते म्हणाले होते की, “दीदींच्या अंत्यसंस्काराला मी एकदा नाही तर तीनदा जाण्याचे मान्य केले होते. पण, प्रत्येकवेळी मी स्वतःला मागे खेचले. मला त्यांना आम्हाला सोडून जाताना बघायचे नव्हते.” धर्मेंद्र यांनी सांगितले की, लताजी त्यांच्यासाठी अधूनमधून भेटवस्तू पाठवत असत आणि त्यांना प्रेरीतही करत असत.

धर्मेंद्र अनेकदा लताजींशी बोलायचे फोनवर 

धर्मेंद्र म्हणाले होते की, “एकदा मी ट्विटरवर एक दुःखद पोस्ट टाकली होती, त्यानंतर त्यांनी मला ताबडतोब फोन केला.” लताजींनी धर्मेंद्र यांची प्रकृतीबद्दल विचारणा केली आणि त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा –

 

 

हे देखील वाचा