Friday, November 22, 2024
Home कॅलेंडर चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही हेमा यांची लव्हस्टोरी, भर मंडपात जितेंद्र यांना सोडून धरला होता धर्मेंद्र यांचा हात

चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही हेमा यांची लव्हस्टोरी, भर मंडपात जितेंद्र यांना सोडून धरला होता धर्मेंद्र यांचा हात

बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमकथेबद्दल अनेक प्रसिद्ध कथा आहेत. ’शोले’ चित्रपटाच्यावेळीही ते त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत असायचे. हेमा मालिनी यांच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांचे लग्न अभिनेते जिंतेद्र यांच्याशी ठरवले होते. दोघे लग्नाच्या मंडपात पोहोचले होते, पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही. हेमा मालिनी शनिवारी (१६ ऑक्टोबर) आपला ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमकहाणीबद्दल काही रोचक किस्से जाणून घेऊया.

हेमा मालिनी यांनी १९६८ मध्ये आलेल्या ‘सपनों का सौदागर’ या चित्रपटाने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्या या इंडस्ट्रीत आल्या, तेव्हा धर्मेंद्र यांनी एका स्टारचा दर्जा मिळवलेला होता. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत होते. दुसरीकडे हेमा सिनेमासाठी पूर्णपणे नवीन होत्या.

‘या’ चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र केलं काम
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी १९७० मध्ये पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. ‘शराफत’ आणि ‘तुम हसीन में जवान’ या चित्रपटात दोघांची जोडी चांगलीच पसंत केली होती. यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ येत असल्याची माहिती समोर येऊ लागली. हेमा आणि धर्मेंद्र यांनी १९७० पासून अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या काळात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

कुटुंबाला मान्य नव्हते नाते
हेमा यांच्या आई-वडिलांना जेव्हा कळाले की, हेमा धर्मेंद्र यांच्याशी लग्न करू इच्छितात. तेव्हा त्यांना आपल्या मुलीचा हात एका विवाहित व्यक्तीच्या हातात द्यायचा नव्हता. ते या नात्याच्या विरोधात होते. मात्र, हेमा यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले होते. यामुळे हेमा यांची आई त्यांच्यावर खूप चिडली होत्या.

स्थळ शोधण्यास केली सुरुवात
हेमा आणि धर्मेंद्र यांच्या नात्याबद्दल समजल्यानंतर, त्यांच्या आईने अभिनेते जितेंद्र यांचे स्थळ त्यांच्यासाठी आणले. त्यांचे प्रेम प्रकरण समजल्यानंतर त्यांच्या आईला वाटले की, हेमा यांचे लवकरात लवकर लग्न करणे योग्य होईल. त्या त्यांच्यासाठी एक चांगला मुलगा शोधू लागल्या, त्यावेळी त्यांना जितेंद्र सापडले. त्यावेळी जितेंद्र आणि हेमा हे दोन चित्रपट एकत्र करत होते. दोघांमध्ये सुरेख ट्यूनिंगही होते.

जितेंद्र यांच्याशी हेमा यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली. हेमा यांच्या आईने जितेंद्र यांच्याशी लग्नाचे पूर्ण नियोजन केले. हेमा यांना जितेंद्र यांच्या आई-वडिलांनाही भेटायचे होते आणि दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शवली होती. प्रत्येकजण या लग्नासाठी खूप उत्सुक होता.

हेमा आणि जितेंद्र गेले पळून
हेमा आणि जितेंद्र त्यांच्या कुटुंबियांसह रात्रीचेच मद्रासला गेले होते. ते तिथे लग्न होणार होते. पण काही वृत्तपत्रांना ही बातमी मिळाली आणि ती संध्याकाळच्या वृत्तपत्रात छापली होती.

वर्तमानपत्रातील बातमी ऐकून धर्मेंद्र हैराण झाले. जितेंद्र त्यांची एअरहोस्टेस गर्लफ्रेंड असलेल्या शोभा सिप्पीच्या घरी पोहोचले. दोघांनी प्रकरण हाताळण्यासाठी मद्रास गाठले होते.

 

एकदम फिल्मी सीन
आता मद्रासमधील सीन ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा कमी नव्हता. नवरदेव, नवरी आणि नवरदेवाची गर्लफ्रेंड, नवरीचा प्रियकर लग्न थांबवण्यासाठी आले आहेत. हेमा मालिनीच्या वडिलांनी धर्मेंद्र यांना धक्के मारून बाहेर काढले.

धर्मेंद्र हे आपल्या बोलण्यावर टिकून राहिले आणि असभ्य न राहता गुंडागिरी दाखवत राहिले. अखेरीस त्यांना एकट्या हेमा यांच्याशी बोलण्याची परवानगी मिळाली. जितेंद्र यांचे कुटुंब, हेमा यांचे कुटुंब आणि लग्नासाठी वाट पाहत होते..

विनंती करत राहिले धर्मेंद्र
धर्मेंद्र हेमा यांना विनंती करत राहले की, इतकी मोठी चूक करू नको. बाहेर जितेंद्र यांची गर्लफ्रेंड शोभा हिने त्यांना विचारले की, काय चालले आहे. तेव्हा ते तिच्या समोर वळले आणि म्हणाले की, “मी हेमाशीच लग्न करेन.”

हेमा खोलीतून बाहेर आल्यानंतर जितेंद्र यांनी सगळ्यांना लग्न पुढे ढकलण्याची विनंती केली. पण जितेंद्र यांचे कुटुंबीय ठाम होते की, एकतर लग्न आता होईल किंवा कधीच होणार नाही. हेमा यांनी लगेच नकार दिला आणि जितेंद्र शोक करत तिथून निघून गेले.

 

धर्मेंद्र यांनी धर्म बदलून केले होते लग्न
धर्मेंद्र यांना त्यांची पत्नीपासून वेगळे व्हायचे नव्हते. हेमा दक्षिण भारतीय कुटुंबातील होत्या. हेमा आणि धर्मेंद्र यांचे प्रेम ‘शोले’ चित्रपटादरम्यान फुलले. हिंदू असल्याने धर्मेंद्र यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि हेमा यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासमोर एक अटही ठेवली होती की, लग्नानंतर ते आपली पहिली पत्नी प्रकाश कौर आणि त्यांच्या कुटुंबाला सोडणार नाही. हेमा यांनी त्यांची अट मान्य केली. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’नंतर दोघांनी १९७९ मध्ये लग्न केले.

 

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना आहेत दोन मुली
धर्मेंद्र आणि हेमा यांच्या लग्नानंतर दोघांना दोन मुले झाल्या आहेत. त्यांचे नाव ईशा देओल आणि अहाना देओल आहे. ईशा देओलने सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. नंतर तिचे लग्न झाले. त्याचवेळी, तिची धाकटी बहीण अहाना देओल एक लेखिका आणि इंटिरिअर डिझायनर आहे आणि ती देखील आनंदाने तिचे वैवाहिक जीवन जगत आहे.

‘या’ चित्रपटांमध्ये केले एकत्र काम
धर्मेंद्र आणि हेमा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘नया जमाना’, ‘सीता और गीता’, ‘राजा जानी’, ‘जुगनू’, ‘पत्‍थर और पायल’, ‘प्रत‍िज्ञा’, ‘बर्न‍िंग ट्रेन’, ‘द‍िल का हीरा’, ‘अलीबाबा और ४० चोर’, ‘आसपास’, ‘रज‍िया सुल्‍तान’ आणि ‘शोले’ ‘हे ​​यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये समाविष्ट आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रात्री झोपताना कोणीतरी दाबायचे हेमा मालिनींचा गळा; अभिनेत्रीने सांगितली ‘झपाटलेल्या’ घराची कहाणी

-चित्रपट निर्मात्यांच्या बायका उडवायच्या हेमा मालिनींच्या साडीची खिल्ली; म्हणायच्या, ‘ती पाहा…’

-‘जॉनी मेरा नाम’ चित्रपटाच्या वेळी देव आनंदसोबत काम करताना नर्व्हस झाल्या होत्या हेमा मालिनी; म्हणाल्या…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा