बॉलिवूडचे ‘ही मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात दिसणार आहेत आणि या दरम्यान त्यांनी चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड पसंत पडला आहे.
धर्मेंद्र यांचा कमबॅक
धर्मेंद्र बऱ्याच काळानंतर चित्रपटामध्ये कमबॅक करत आहेत. सध्या ते करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी काम करत आहेत. धर्मेंद्र यांनी चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते शूटिंगचा खूप आनंद घेत असल्याचे दिसत आहे.
धर्मेंद्र यांचा व्हिडिओ व्हायरल
धर्मेंद्र यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते चहा पिताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये धर्मेंद्र म्हणाले की, “कसे आहात, मी चहा पित असताना शूटिंगचा आनंद घेत आहे. ईथे छान वाटत आहे. खुप सारं प्रेम. चीयर्स.” यासह, त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “मित्रांनो, आशीर्वाद आणि शुभेच्छासह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’साठी कॅमेऱ्यावर रोमान्स करत आहे.”
नेटकरी देत आहेत प्रतिक्रिया
आता नेटकरी यावर वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने विचारले, “तुमच्या फिटनेसचे रहस्य काय आहे?” त्याचवेळी दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “लव्ह यू सर, लव्ह ओनली देओल.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “व्वा, आजही खूप देखणेे दिसत आहात.” याशिवाय, सर्व चाहत्यांनी व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत.
रणवीर-आलिया पुन्हा आले एकत्र
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच जया बच्चन आणि शबाना आझमी देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या घोषणेसह प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांना रणवीर-आलियाची जोडी खूप आवडते. यापूर्वीही दोघांना चित्रपटात एकत्र पाहिले गेले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिसल्या सायरा बानो; हातात होता दिलीप कुमारांचा फोटो
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’