सध्या प्रवीण तरडे यांच्या धर्मवीर भाग दोन या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. येत्या २७ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. आनंद दिघे यांच्या जीवनाची गाथा मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी फार चांगल्या मनाने स्वीकारलं आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही प्रवीण तरडे यांनी केले आहे. सध्या प्रवीण या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी जाऊन ते मुलाखती देत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण यांनी त्यांच्या मनातील एक इच्छा बोलून दाखवली आहे.
प्रवीण तरडे, प्रसाद ओक आणि मंगेश देसाई यांनी दिलेल्या एला मुलाखतीत प्रवीण यांना विचारण्यात आले होते कि तुम्हाला आणखी कोणत्या राजकीय नेत्यावर बायोपिक करायला आवडेल? त्यावर प्रवीण यांनो दिलेले उत्तर सर्वांनाच सरप्राईज करणारे होते. प्रवीण तरडे यांना आनंद दिघे यांच्या नंतर राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या जीवनावर सिनेमा बनवायचा आहे. तशी त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, प्रत्येक राजकारण्याची एक खासियत आहे. आजही शरद पवार साहेब गाडीतून उतरले कि बांध्यावरच्या माणसाला हाक मारतात. शिंदे साहेबांची वेगळी छाप आहे. राज ठाकरे कसेही बोलले तरी लोक त्यांच्यावर प्रेम करतात. उद्धव साहेब एक छान छायाचित्रकार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारणी व्यक्तीचा एक एक चांगला गुण आहे. तो आपण राजकीय चष्म्यातून नाही बघितला पाहिजे.
शरद पवार यांच्यावर चित्रपट करायला आवडेल कारण साहेबांना आम्ही बांधावरचा नेता म्हणतो. मी स्वतः शेतकरी आहे. ते सतत शेतावर, बांधावर असतात. त्यांचं आयुष्य देखील कमाल आहे. ते अगदी सामान्य कुटुंबातून आले आहेत. आधी ते भाज्या सुद्धा विकायचे. त्यांचा प्रवास खरच खूप रंजक आहे. दुसरे म्हणजे पतंगराव कदम. त्यांच्यावर देखील सिनेमा बनवायला मला नक्कीच आवडेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
निक्कीला शारीरिक सुरक्षा द्या; निक्कीच्या आईची बिग बॉसला विनंती. व्यक्त केली तीव्र प्रतिक्रिया…