Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर

सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर

आपल्या प्रभावी आणि सजीव अभिनयाने सर्वांचेच मनं जिंकणाऱ्या सतीश कौशिक यांचे आज (९ मार्च) दुःखद निधन झाले. सतीश कौशिक यांनी अभिनेते, दिग्दर्शक, स्क्रिप्ट रायटर, निर्माता अशा विविध कामांमध्ये यश मिळवले. त्यांनी मुख्यत्वे कॉमेडी भूमिकांमधून त्यांची प्रेक्षकांवर छाप पडली. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या सर्वच कॉमेडी भूमिका तुफान गाजल्या. आजही त्या सर्वांच्या लक्षात नक्कीच असतील. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे निधन झाले आहे. या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडाले आहे. सतीश यांच्या अचानक झालेला मृत्यू अनेकांना पचनीच पडत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या जिवलग मित्राच्या निधनाची माहिती देताना ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, “मला माहिती आहे की, मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे. पण ही गोष्ट आज मी जिवंत असताना माझा जीवलग मित्र सतीश कौशिक याच्यासाठी लिहिन, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. ४५ वर्षांच्या मैत्रीला अचानक मिळालेला पूर्णविराम. सतीश तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखे कधीच होणार नाही. ओम शांती”.

अभिनेत्री कंगना रणौतने देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली असून, त्यांनी तिच्यासोबत तिच्या आगामी इमर्जन्सी सिनेमात काम देखील केले आहे. कंगनाने लिहिले, “या भयानक बातमीसोबत माझी सकाळ झाली. ते माझे सर्वात मोठे चियरलिडर होते. एक यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक असणारे सतीश कौशिकजी खऱ्या आयुष्यातही अतिशय दयाळू आणि प्रामाणिक व्यक्ती होते. त्यांनी उणीव नेहमीच भासेल, ओम शांती.”

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी लिहिले, “मी अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनामुळे स्तब्ध झालो आहे. ते नेहमीच उत्साही, आनंदी, भरभरून जीवन जगणारे होते. त्यांना सिनेसृष्टीतील लोकांसोबतच सर्वच समरणात ठेवतील. त्यांच्या कुटुंबाप्रती माझी सांत्वना. ओम शांती.”

मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “मी अजूनही मोठ्या धक्क्यात आहे. खूपच मोठी क्षती आहे. सतीश कौशिक यांच्या कुटुंबाबद्दल माझी सांत्वना. ओम शांती.”

 

तर मराठी इंडस्ट्रीमधील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता कुशल बद्रिकेने लिहिले, “या वर्षी आमचं calendar हरवलं यार”. तर अभिनेता श्रेयश तळपदे ने लिहिले, “खूप दु:खद घटना आहे. तुमच्यासारखे कोणी नव्हते आणि होऊही शकणार नाही. तुमच्या भूमिकांव्यतिरिक्त दयाळूपणा, साधेपणा व हसणं सगळ्यांच्या लक्षात राहील. सतिशजी, तुम्ही कायमच स्मरणात राहाल. ओम शांती”. यासोबतच अक्षय कुमार, रितेश देशमुख, सनी देओल, जॉनी लिव्हर, शिव ठाकरे, अनिरुद्ध दुबे, करीना कपूर, सुनील शेट्टी, गुरमीत चौधरी, सौंदर्या शर्मा, मनोज जोशी, अभिषेक बच्चन, विवेक अग्निहोत्री, नेहा धुपिया, राज बब्बर, निल नितीन मुकेश, नवाजुद्दीन सिद्धीकी, अरमान मलिक, तनिषा मुखर्जी आदी अनेक कलाकारांनी त्यांना दुःखद अंतराकरणातून श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. त्यांनी त्यांच्या कारर्किदीत जवळपास १०० पेक्षा अधिक चित्रपटात काम केले तर, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’, ‘तेरे नाम’, ‘क्योंकि’, ‘ढोल’, ‘कागज’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

तर ‘मिस्टर इंडिया’, ‘मोहब्बत’, ‘जलवा’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘अंदाज’, ‘मिस्टर और मिसेज खिलाड़ी’, ‘साजन चले ससुराल’, ‘दिवाना मस्ताना’, ‘परदेसी बाबू’, ‘बड़े मियां छोटे मियां’, ‘हसीना मान जाएगी’, ‘राजा जी’, ‘आ अब लौट चलें’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘चल मेरे भाई’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आजारी असलेल्या सुलोचना दीदींच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड, बॉलिवूडवर शोककळा

हे देखील वाचा