Saturday, September 30, 2023

“आम्ही नक्कीच त्यांना तुमच्यापेक्षा…” गश्मीर महाजनीने ट्रोलिंगवर शेअर केली ‘ती’ पोस्ट म्हणाला…

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय हँडसम, लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते असलेल्या रवींद्र महाजनी यांचे १५ जुलै रोजी दुःखद निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या आठ महिन्यांपासून ते पुण्याजवळील तळेगाव दाभाडे जवळील आंबी या ठिकाणी एका भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. अचानक त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि रवींद्र महाजनी यांच्या निधनाचा खुलासा झाला.

मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी आणि त्यांच्या संपूर्ण महाजनी कुटुंबावर लोकांनी अनेक आरोप करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून गश्मीरला आणि महाजनी कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेक कलाकार या कठीण प्रसंगी गश्मीर आणि त्यांच्या कुटुंबासोबत असून, त्याला पाठिंबा देत आहेत. मात्र आता खुद्द गश्मीरने एक पोस्ट शेअर करत यावर भाष्य केले आहे.

गश्मीरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले, “कलाकार हा कायमच कलाकार असतो. या घटनेनंतर मी, माझ्या कुटुंबाने, जवळच्या व्यक्तींनी शांत राहणे पसंत केले. आम्ही शांत असल्याने अनेक लोकं आमचा द्वेष करत असून, शिव्याही देत आहे आम्ही त्याचे देखील स्वागतच करतो.

आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला देव शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही नक्कीच त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगले ओळखत होतो. मी याबद्दल भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर नक्कीच बोलेन.”,

दरम्यान रवींद्र महाजनी यांचा मुंबईचा फौजदार, देवता हे चित्रपट खूप गाजले. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात मधुसुदन कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकातून केली. त्यानंतर ते झुंज या चित्रपटात दिसले.

हे देखील वाचा