Wednesday, July 3, 2024

दुख:द! कन्नड अभिनेते जीके गोविंद राव यांचे निधन, वयाच्या ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गेल्या काही दिवसांपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून सातत्याने दुःखद बातम्या येत आहेत. या क्रमाने पुन्हा एकदा इंडस्ट्रीसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. कन्नड चित्रपट अभिनेते आणि नाटककार जीके गोविंद राव यांचे शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) निधन झाले आहे. वयाशी संबंधित समस्यांमुळे ८४ वर्षीय अभिनेत्याने हुबळीमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते शेवटच्या दिवसात त्यांच्या मुलीच्या घरी राहत होते. जीके गोविंद राव यांच्या कौटुंबिक स्रोतांकडून याबाबत माहिती मिळाली. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

गोविंद राव यांचा जन्म २७ एप्रिल १९३७ रोजी बंगळुरू येथे झाला होता. त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला होता. ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांनी अनेक जनआंदोलनांमध्ये भाग घेतला होता. त्यांनी एका छोट्या कादंबरीसह, अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

गोविंद राव यांनी थिएटर, चित्रपट तसेच सोप ऑपेरामध्ये आपला ठसा उमटवला होता. ‘ग्रहाना’, ‘मिथिल्या सीथेयारु’, ‘कर्फ्यू’, ‘अज्जू’ आणि ‘शास्त्री’ यांमधील भूमिकांसाठी प्रेक्षक त्यांची आठवण काढतात. त्यांनी लोकप्रिय मालिका ‘मालगुडी डेज’ आणि ‘महापर्व’ मध्येही काम केले.

विभाजनकारी राजकारणावर गोविंद राव उघडपणे टीका करत असायचे. याशिवाय ते तर्कशुद्ध विचारांचे होते. ते अंधश्रद्धांच्या समजुतींनाही विरोध करायचे. दरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि एचडी कुमारस्वामी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्येष्ठ अभिनेत्री बेगम फारुख जाफर साहिबा काळाच्या पडद्याआड, आज केले जाईल ‘सुपूर्द-ए-खाक’

-चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही हेमा यांची लव्हस्टोरी, भर मंडपात जितेंद्र यांना सोडून धरला होता धर्मेंद्र यांचा हात

-सूर्यास्ताच्या वेळी समुद्र किनारी स्वतःचा सहवास एन्जॉय करताना दिसली पूजा सावंत, आकर्षक लूकने चाहते घायाळ

हे देखील वाचा