भारतात सध्या अनेक सण साजरे केले जात आहेत. आहेतच रविवारी (२४ ऑक्टोबर) रोजी करवाचौथ हा सण साजरा करण्यात आला आहे. या दिवशी सर्व विवाहित महिला त्यांच्या पतीसाठी व्रत करतात. सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत त्या हे व्रत करत असतात. रात्री चंद्राचे आणि पतीचे तोंड पाहून त्या पतीच्या हाताने त्यांचे हे व्रत तोडत असतात. बॉलिवूड कलाकारांनीही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे. अनेक अभिनेत्रींनी सोशल मीडियावर त्यांच्या पतीसोबत तसेच करवाचौथच्या पूजेसोबत फोटो शेअर केले आहेत.
अशातच बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्या घरी देखील करवाचौथ सण उत्साहाने साजरा झाला आहे. या दिवशी त्याची पत्नी सुनीता आहुजा हिने देखील त्याच्यासाठी व्रत केले होते. यातच खास गोष्ट म्हणजे गोविंदाने त्याच्या पत्नीला एक सुंदर सरप्राईज गिफ्ट दिले आहे.
गोविंदने पती सुनीता हिला करवाचौथच्या दिवशी बीएमडब्ल्यू ही कार गिफ्ट केली आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या पत्नीसोबत तसेच कारसोबत फोटो शेअर करून ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सुनीता आणि गोविंदा नवीन गाडी समोर उभे आहेत. सुनिताने लाल रंगाची साडी नेसून साजशृंगार केलेला दिसत आहे, तर गोविंदा देखील लाल रंगाच्या कुर्तामध्ये दिसत आहे. (Actor govinda give BMW car gift to his wife on occasion of karwa chauth)
हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “माझी सगळ्यात जवळची मैत्री, माझी प्रियसी, माझ्या दोन गोड मुलांची आई, हॅप्पी करवाचौथ. तुला खूप खूप प्रेम. मी तुझ्यावर मोजता येणार नाही एवढे प्रेम करतो. मात्र, आजच्या दिवशी या छोट्याशा गिफ्टने ते मोजून घे. तू या जगातील सगळ्या आनंदाची वाटेकरी आहेस. लव्ह यू सोना.”
त्याचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून त्यांचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या एका चाहतीने या फोटोवर कमेंट केली आहे की, “नवरा असावा तर तुमच्यासारखा.” तसेच बाकी अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘लाल साडी, जड दागिने’, करवाचौथच्या दिवशी नववधूच्या लूकमध्ये दिसली राखी सावंत
-उर्वशी रौतेलाने बिकिनी घालून दिल्या करवाचौथच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले थक्क
-जया बच्चनसोबत रोमँटिक फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी दिल्या करवा चौथच्या शुभेच्छा