Saturday, June 29, 2024

सलमानला काय गिफ्ट देणार? गोविंदाचे उत्तर ऐकून व्हाल थक्क; म्हणाला, ‘त्याची आधीच वाट…’

‘हिरो नंबर वन’, ‘पार्टनर’, ‘कुली नंबर वन’, ‘जोडी नंबर वन’, ‘शोला और शबनम’, अशा चित्रपटांची नावं घेतली की, समोर दिसतो तो गोविंदा. आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने आपली ओळख बनवलेल्या गोविंदाने अभिनयाचे कौशल्य तर सर्वांना दाखवलेच, पण त्याच्या वाट्याला सर्वाधिक कौतुक आलं ते त्याच्या डान्स स्टाईलमुळे. त्याने रोमँटिक, ऍक्शन, कॉमेडी अशा सगळ्याच भूमिकेत आपली छाप पाडली. म्हणूनच तो बॉलिवूडचा सुपरस्टार बनला. अशातच गाेविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आपला जिगरी मित्र सलमान खान विषयी एक माेठं वकतव्य केलं आहे. 

बाॅलिवूडमध्ये सलमान खान(Salman Khan)आणि गाेविंदा(Govinda)यांच्या मैत्रीचे चर्चे कायमच असते. अशात दाेघांचं बॉन्डिंग असणे साधारण गाेष्ट आहे. अशातच गाेविंदा एका इवेंटमध्ये गेला हाेता जिथं त्याला सलमान खान विषयी प्रश्न विचारण्यात आला.

गाेविंदा एका रेडिओ चॅनलमध्ये सहभागी झाला हाेता. इथं एका रिपाेर्टरने त्याला प्रश्न विचारलं की, “एक मित्र म्हणुन ताे सलमान खानला काय गिफ्ट देऊ इच्छिताे?” या प्रश्नावप गाेविंदा सर्व प्रथम हसला. मग मजेशीर उत्तर देत ताे म्हणाला,”जिस आदमी की निकल पड़ी हो, त्याला काय गिफ्ट द्यावे.” ताे म्हणाला, “खरंतर मी त्याविषयी कधी विचारच केला नाही. मला असे वाटते की, मी कायमच आपल्या कामाला, कुटुंबाला आणि मित्रांनसाेबत असलेल्या नात्यावर जास्त लक्ष देताे.”

गाेविंदा ने पुढे सांगितले की, “मैत्रीची ही नवीन पद्धत आहे जिथं तुम्ही गिफ्ट देता आणि घेता, आम्ही असं करत नाही. आम्ही फक्त हा विचार करताे की, आम्हाला चांगल काम मिळालं आहे आणि त्याकरिता देवाचे धन्यावाद. देवाने आम्हाला जे दिल आहे त्याकरिता आम्ही त्यांचे सदैव रुणी आहाेत.”

एके काळी गाेविंदा आणि सलमानची मैत्री बाॅलिवूडमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत हाेती. ‘पार्टनर’, ‘मैं और मिसेज खन्ना’, ‘सलाम-ए-इश्क’, ‘वान्टेड’  यासारख्या दमदार चित्रपटात त्यांनी साेबत काम केलं. पार्टनर चित्रपटात दाेघांची जाेडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली हाेती. मात्र, गेल्या काही वर्षात गाेविंदाने अनेक खुलासे केले. ज्यात त्याने सलमान खानवर त्याचा स्टारडम चाेरण्याचा आणि करिअर बर्बाद करण्याचा आराेप लावला हाेता.

असे असले तरी, गाेविंदाने फिल्म इंडस्ट्रीत  35 वर्ष पुर्ण केलं आहे. त्याला अखेरच 2018मध्ये ‘रंगीला राजा’ या चित्रपटात बघितल्या गेलं हाेतं. गाेविंदाचे गाणं आजही चाहत्याना ताेंडपाठ आहे. त्याची डान्स स्टाईल सुपरहिट आहे. गाेविंदा लवकरच स्वत:च्या बायाेग्राफी वर काम करणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अबब! प्रदर्शित होण्याआधीच शाहरुखच्या चित्रपटाने केली बजेटपेक्षा जास्त कमाई

“रिलीज होण्यापूर्वी मजा आली, पण…”; हिरोपंती 2 बद्दल टायगर श्रॉफचे खळबळजनक वक्तव्य

हे देखील वाचा