Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड ‘दबंग’ फेम दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमान खान अन् कुटुंबावर केले होते ‘हे’ आरोप

‘दबंग’ फेम दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमान खान अन् कुटुंबावर केले होते ‘हे’ आरोप

सलमान खानचा ब्लॉकबस्टर ‘दबंग’ सिनेमा दिग्दर्शित करणारे यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असणारे अभिनव कश्यप आज (६ सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमधील यशस्वी आणि हटके चित्रपटांसाठी ओळखले जाणाऱ्या अनुराग कश्यप यांचे भाऊ असणारे अभिनव देखील प्रतिभावान दिग्दर्शक असल्याचे त्यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटातूनच दाखून दिले.

आज अभिनव त्यांचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ६ सप्टेंबर १९७४ रोजी त्यांचा जन्म झाला. दबंग चित्रपटानंतर अभिनव प्रकाशझोतात आले. मात्र नंतर ते गायबच झाले. पण जेव्हा त्यांनी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर अनेक खळबळजनक आरोप केले तेव्हा ते प्रचंड प्रसिद्धीमध्ये आले.

अभिनव यांनी बॉलिवूडचा भाईजान असणाऱ्या अभिनेता सलमान खानवर कारकीर्द खराब केल्याचा मोठा आरोप केला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनवने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, ज्या पोस्टमुळे मोठ्या चर्चा तर रंगल्या मात्र त्या पोस्टमधील मजकुरामुळे मोठी खळबळ देखील माजली होती.

अभिनव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “सुशांतच्या मृत्यूमुळे यशराज फिल्म्सच्या टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कदाचित यामुळेच त्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे. हा तपास अधिकारी करतच आहे. हे लोकं तुमची कारकीर्द बनवत नाही ते खराब करतात. मी स्वतः मागील एक दशकापासून याचा त्रास सहन करत आहे.”

 

या पोस्टमध्ये अभिनवने ‘दबंग’ नंतरच्या १० वर्षांची कहाणी सांगितली. त्यांनी लिहिले की, “’दबंग २’च्या निर्मितीमधून बाहेर पडण्याचे कारण अरबाज खान आणि सोहेल खानने त्याच्या कारकिर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.” त्यांनी लिहिले की, “मला घाबरवले गेले आणि धमकावले गेले.”

अभिनव यांनी पुढे लिहिले की, “अरबाजने श्री अष्टविनायक फिल्म्ससोबत चालू असलेला माझा प्रोजेक्ट खराब केला. हा प्रोजेक्ट मला राज मेहता यांच्या सांगण्यावरून मिळाला होता. मी श्री अष्टविनायक फिल्म्सला पैसे परत दिले. नंतर, जेव्हा मी व्हायकॉमला गेलो, तेव्हा सोहेल खानने त्याचे सीईओ असलेल्या विक्रम मल्होत्रा ​​यांना धमकी दिली. मला ७ कोटी असलेली सायनिंग फी ९० लाख व्याजासह परत करावी लागली. मग मी रिलायन्स एंटरटेनमेंटसोबत ‘बेशरम’ चित्रपट केला. इथेही सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाने चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये अडथळे आणण्यास सुरुवात केली.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी माझ्यावर चिखलफेक करण्यात आली आणि एक नकारात्मक मोहीम चालवली गेली. यामुळे वितरक माझा चित्रपट खरेदी करण्यास घाबरले. मला ठार मारण्याची आणि कुटुंबातील महिला सदस्यांवर बलात्कार करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. याचा माझ्या मानसिक आरोग्यावर आणि माझ्या कुटुंबावर खोल परिणाम झाला.

 

माझे कुटुंब वेगळे झाले. जेव्हा मी २०१७ मध्ये एफआयआर नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. तेव्हा माझी तक्रार नोंदवली गेली नव्हती. सलमानचे कुटुंब धमकावण्यासाठी पैसा, राजकीय शक्ती आणि अंडरवर्ल्डचा वापर करते.” असे देखील त्यांनी लिहिले होते.”

अभिनव यांनी चित्रपटांमध्ये येण्याआधी अनेक मालिकांचे देखील दिग्दर्शन केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

 

 

 

हे देखील वाचा