Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘अवघ्या ३ महिन्यात तुम्ही मला…’ अभिनेता हरीश दुधाडेची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात टेलिव्हिजन विश्वातील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला, आणि त्या जागी नवीन मालिका सुरु झाल्या. जवळपास सर्वच चॅनेल्सवर नवीन बऱ्याच मालिका सुरु झाल्या आहेत. अशातच टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय मालिका असलेल्या ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. अल्पावधीतच या मालिकेने आणि यात दाखवल्या गेलेल्या गूढ कथेमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. उत्तम कथा, प्रतिभावान कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आदी सर्वच गोष्टी एकदम चांगल्या जुळून आल्याने ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेत विजय भोसले या पोलिसांच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेता हरीष दुधाडेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिका, मालिकेशी संबंधित सर्व लोकांचे आभार मानणारी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

हरीष दुधाडेने त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करताना लिहिले, ““तुमची मुलगी काय करते”
आजवर अनेक मालिका केल्या आणि करत राहू , पण ही मालिका माझ्या आयुष्यात खास जागा करून गेली . यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे “इन्स्पॅक्टर विजय भोसले .” पोलिसांची भूमिका कराचं माझ स्वप्न पूर्ण झालं . एका वेगळ्या धाटणीचा भोसले साकारताना भूमिका उभी रहाताना लागलेले हात विसरून कसं चालेल ? सर्व प्रथम सोनी मराठी ज्यांनी माझ्यावर विश्वासठेवला , सूर्यभान नंतर अवघ्या ३ महिन्यात तुम्ही मला तयार व्हायला सांगितलं ते भोसले साठी.

स्ट्रॉबेरी पिक्चरशी माझं तुमच्याशी असलेलं नातं जूनं आणि आपुलकीचं आहे त्या मुळे तुमचा फोन आणि मी विचारावं “कधिपासून ?” एवढंच काय ते संभाषण होत आपल्यात कायम…

मनवा नाईक “सरस्वती , तू सौभाग्यवती हो , शिवप्रताप , तुमची मुलगी काय करते , काळीराणी ” मला वाटतं एवढ्या नावांमधेच कळते आपली केमिस्ट्री. प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभी राहिलेली एक कमाल व्यक्ती . “माणूस चांगलं असावं “अस सतत तू सांगतेस आणि तसं जगतेस . रिस्पेक्ट आणि मनापासून आभार ,या भूमिकेसाठी मला निवडलंस .

चिन्मय मांडलेकर राजे ..तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक सीनला जागण्याचा प्रयत्न मी केला , मी स्वताःला नशीबवान समजतो की एकापाठोपाठ एक दोन मालिकांमधून मी तुमच्याबरोबर काम केलं.

मुग्धा गोडबोडे रानडे तुझ्याबद्दल काय बोलू.. भोसले या पात्राला बोलतं करण्याचं काम तुझं. तुझ्या संवादांवर उभा राहिला भोसले . तुझा माझ्यावरचा विश्वास “शिरसावंद्य”. मैत्रिणतर तू आहेसच पण त्याहीपेक्षा तू कमाल माणूस आहेस .

भीमराव मुडे तू आहेस म्हणून आज भोसले दिसला. ऋणी आहे मी तुझा. कारण भोसले उभा करताना बारकावे तू मला दाखवलेस आणि माझ्याकडून करून घेतलेस .. मग तो ६ मिनिटांचा एक शॉट असो किंवा कुठलाही सीन असो. तू दिलस आणि मी ते केलं.

 

अमेय मोरे आणि रोहित रत्नपारखे, तुम्ही खंबीरपणे माझ्या मागे उभे राहीलात. नितीन पवार तुम्ही सगळे पदोपदी माझा हात धरून मला motivate केलत … एवढच नाही तर मी कधी खचलोच तर तुम्ही माझा हात धरून पुन्हा मला उभं केलत , त्यासाठी मनापासून आभार … पुढच्या पर्वात भेटूच , पण TMKK कायम स्मरणात राहिल तुम्हा सर्वांमुळे …तुमचाच, हरीष दुधाडे”.

हरीशने शेअर केलेल्या या पोस्टमधून त्याने या मालिकेचा नवीन सिझन येणार असल्याची देखील एक हिंट दिली आहे. हरीश हा मराठी मनोरंजनविश्वातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. ‘माझे मनं तुझे झाले’, ‘पावनखिंड’, फत्तेशीखस्त’, ‘सरस्वती’, ‘तू सौभाग्यवती हो’ आदी अनेक मालिका आणि चित्रपटांमधून त्याने त्याच्यातील सकस अभिनेत्याला प्रेक्षकांसमोर आणले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?

कबीर बेदीने वयाच्या 70 व्या वर्षी 30 वर्षांनी लहान प्रेयसीसाेबत केले लग्न, वाचा संपूर्ण किस्सा

हे देखील वाचा