अभिनेता हरमन बावेजा २००० च्या दशकात त्याच्या लूक आणि स्टाइलसाठी ओळखला जात होता. एक काळ असा होता जेव्हा,अभिनेता हरमन बावेजाची तुलना त्याच्या लुक्समुळे ऋतिक रोशनशी केली जायची. पण आता मात्र अनेक वर्ष झाल्यानंतर हरमनचा लूक पूर्णपणे बदलला आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासुन हरमन चित्रपट सृष्टीपासुन दूर देखील आहे. असे अचानक अभिनेता हरमन बावेजा पुन्हा एकदा चर्चेत येण्यासाठी एक कारण आहे.
बर्याच दिवसांपासून अभिनयापासून दूर असलेला हरमन लवकरच ‘स्कूप’ या वेबसिरीजद्वारे अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. त्याने २००८ मध्ये ‘लव्ह स्टोरी २०५०’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अलीकडेच माध्यमांशी संवाद साधताना हरमनने इतके दिवस चित्रपटांपासून दूर राहण्याचे कारण सांगितले. या सिरीजमुळे आता तो पुन्हा प्रसिध्दीच्या झोतात आला आहे.
तो म्हणाला की, “चित्रपटांपासून दूर राहण्याच्या निर्णयाचा स्क्रिप्टशी काहीही संबंध नाही. मी मोजक्याच चित्रपटात काम केले. माझ्या कामावर बरीच टीका झाली. मी त्याला पात्र होतो. मात्र, लोकांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली, त्यामुळे मला खूप त्रास झाला आणि म्हणून मी चित्रपटांमधून ब्रेक घेतला.”
प्रियांका चोप्राच्या ‘व्हॉट्स युवर राशि’ या चित्रपटातही तो दिसला होता. मात्र, त्याच्या अभिनयामुळे त्याला खूप टीकेला सामोरे जावे लागले. त्याची फिल्मी कारकिर्द यशस्वी होऊ शकली नाही. आता त्याने लाइमलाइटपासून दूर राहण्याचे कारण सांगितले आहे.
यादरम्यान ‘स्कूप’ नेटफ्लिक्सवर २ जून रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये हरमनला शोधणे कठीण आहे. हरमनला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहून लोकांना आश्चर्य वाटले. या चित्रपटात त्याच्यासोबत करिश्मा तन्ना, प्रोसनजीत चॅटर्जी आणि झीशान अयुब हे कलाकार देखील दिसणार आहेत.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, हरमनने २०२१ मध्ये साशा रामचंदानीशी लग्न केले. साशा एक न्यूट्रिशनिस्ट आणि हेल्थ कोच आहे. साशा इंस्टाग्रामवर हेल्दी डाएट आणि योगाबद्दल पोस्ट करते. गेल्या वर्षी त्यांना पहिल्या मुलगा झाला आहे. आता पुन्हा हरमनला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह
विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’