बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती. हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. चित्रपटात सलमान खान, करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यानंतर सर्वांचे लक्ष लहान मुलगी हर्षाली मल्होत्राकडे वेधले गेले. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात ‘मुन्नी’ ची भूमिका साकारणाऱ्या हर्षालीने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मुन्नीची भूमिका साकारून हर्षाली एका रात्रीत स्टार झाली. हर्षाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे व्हिडिओ शेअर करते. नुकताच हर्षाली मल्होत्राने पुन्हा एकदा तिचा एक सुंदर व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हर्षालीने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे शॉर्ट जॅकेट आणि पँट परिधान करून ती बादशाहच्या ‘जुगनू’ गाण्यावर किलर स्टाईलमध्ये डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये हर्षाली खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हर्षालीच्या डान्सशिवाय तिचा फिट लूक चाहत्यांना खूप इम्प्रेस करत आहे. हर्षालीने हा व्हिडिओ शेअर करत “चमकू जैसे जुगनू,” असे लिहिले आहे.
हर्षालीचे चाहते तिच्या फिटनेसवरही कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “मुन्नी फिट झाली आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “परफेक्ट बॉडी बनवली आहे.” या पोस्टवर कमेंट करताना आणखी एका युजरने लिहिले की, “बाळा, अभ्यासावर लक्ष दे, जर ते चांगले केले, तर हे सर्व करावे लागणार नाही.” हर्षालीच्या या पोस्टला आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखापेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातून हर्षालीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात हर्षालीचे फार डायलॉग नव्हते, तरीही तिला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठे केस, मोठी दाढी अन् कपाळी टिक्का; ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचा डॅशिंग लूक रिलीझ
-‘पंगा क्वीन’ कंगनाने भारताच्या फाळणीवर प्रश्न केले उपस्थित, म्हणाली, ‘आपण स्वातंत्र्य सैनिकांचा…’