Monday, July 1, 2024

दुःखद!! अभिनेता हेनरी डॅरो यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन

चित्रपटसृष्टीवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिग्गज अभिनेता हेनरी डॅरो यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पीआरने फेसबुकवरून ही माहिती दिल्याचे समोर येत आहे. माझ्या मित्राच्या आत्म्याला शांती मिळो अशी पोस्ट करून त्यांनी ही दुःखद बातमी सगळ्यांना सांगितली आहे.

हेनरी डॅरो यांचा जन्म 15 सप्टेंबर 1933 मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला होता. अभिनय क्षेत्रात आवड असल्यामुळे त्यांनी चित्रपटात आणि टेलिव्हिजनवर काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा मृत्यू रविवारी 14 मार्च 2021 रोजी वेलिंग्टन येथे झाला. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आले नाही. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांनाच खूप दुःख होत आहे. तसेच अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहे.

त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच स्क्रीन ॲक्टर ग्रीड यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि लिहिले की, “हेनरी यांच्या कामाबाबत आणि करिअरबाबत मला खूप गर्व आहे. त्यांची ही बातमी वाचून मला खूपच दुःख झाले आहे. त्यांच्या परिवाराच्या दुखात मी सामील आहे.”

आईएमडीबीच्या माहितीनुसार त्यांनी 1967 ते 1971 दरम्यान द हाई चेपरेलच्या सर्व 96 एपिसोडमध्ये काम केले होते. त्यांनी या सिरीजमध्ये मनोलिटो मोनतोया हे पात्र निभावलं होत. त्यांनी सँडा बराबर या नाटकामध्ये महत्वाचं पात्र निभावलं होत. त्यांच्या रफेल कॅस्टिलो या पात्रासाठी त्यांना डेटाइम एम्मी हा पुरस्कार दिला गेला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बच्चन कुटुंबाची लेक असूनही राहिली लाईमलाईटपासून दूर, बिग बींनी वाढदिवशी केले थ्रोबॅक फोटो शेअर

-साठच्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’, ज्याचे संपूर्ण कुटुंब होते चित्रपट उद्योगात

-तबला वादनासोबतच चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उस्ताद ‘झाकीर हुसेन’

हे देखील वाचा