Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ऋतिकने पुन्हा दर्शवला होता पाठिंबा; म्हणाला, ‘हे सर्व अत्यंत…’

आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ऋतिकने पुन्हा दर्शवला होता पाठिंबा; म्हणाला, ‘हे सर्व अत्यंत…’

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अं’मली पदार्थ प्रकरणात अटक झाल्यापासून हे प्रकरण रोज नवनवीन रूप धारण करत होते. मात्र, गुरुवारी (२८ ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला दिलासा मिळाला. न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. असे असले, तरीही या प्रकरणाची सुनावणी बुधवारी (२७ ऑक्टोबर) उशिरापर्यंत सुरू होती. आर्यन खान तुरुंगात असल्यापासून बॉलिवूड कलाकार त्याच्या समर्थनार्थ उभे होते. आर्यनच्या बाजूने बोलणाऱ्या कलाकारांपैकी ऋतिक रोशन देखील एक आहे. या प्रकरणात पुन्हा एकदा ऋतिकने आर्यनला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली होती. त्याची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.

आर्यनला जामीन न मिळाल्याने ऋतिक रोशनने केले होते दु:ख व्यक्त
ऋतिकने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रसिद्ध पत्रकार फाये डिसूझा यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे वकील दुष्यंत दवे यांनी मुलाखतीदरम्यान आपली प्रतिक्रिया दिली होती. ऋतिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जर हे तथ्य असेल, तर हे सर्व अत्यंत दुःखद आहे.”

Photo Courtesy Instagramhrithikroshan

या व्हिडिओमध्ये दुष्यंत दवे यांनी न्यायमूर्ती नितीम सांबरे (आर्यन खानच्या खटल्याची सुनावणी करणारे) यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी २०१८ मध्ये नितीम सांबरे यांनी अं’मली पदार्थ प्रकरणात एका आरोपीला जामीन मंजूर केला होता. या आरोपीकडून ४३० ग्रॅम एवढे अं’मली पदार्थ जप्त करण्यात आले, तरीही त्याला जामीन मिळाला. त्याचवेळी आर्यनकडून कोणतेही अं’मली पदार्थ सापडले नसून त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. दुष्यंत दवे यांनी नितीम सांबरे यांच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले. याआधीही ऋतिकने आर्यनसाठी एक लांबलचक पोस्ट लिहून त्याला पाठिंबा दिला होता.

आर्यन खानच्या जामिनावर पार पडली सुनावणी
आर्यन खानच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी (२८ ऑक्टोबर) सुनावणी पार पडली. सत्र न्यायालयात दोनदा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आर्यनचा खटला माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी पाहत आहेत. आर्यन खानच्या जामीन अर्जाचा गुरुवारी तिसरा दिवस होता. मात्र आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या वकिलांनी बुधवारी (२७ ऑक्टोबर) कोर्टात आपली बाजू मांडली. त्यानंतर गुरुवारी एनसीबी आपली बाजू मांडली. यानंतर न्यायालयाने आर्यनला जामीन दिला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आगामी ‘८३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अभिनेता खूपच उत्सुक; म्हणाला, ‘…क्रिकेटच्या मैदानात रूपांतरित करेल’

-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो

-‘आमच्या नात्यात संवाद असता तर…’ करणने शमितासोबत शेअर केले ब्रेकअपचे कारण

हे देखील वाचा