Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड नवीन वर्षानिमित्त ऋतिक रोशनने केला शर्टलेस फोटो शेअर, बोल्ड अंदाज पाहून करण जोहरने केली ‘अशी’ कमेंट

नवीन वर्षानिमित्त ऋतिक रोशनने केला शर्टलेस फोटो शेअर, बोल्ड अंदाज पाहून करण जोहरने केली ‘अशी’ कमेंट

बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशन आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरही जबरदस्त सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसेच तो फोटोशूदमधील फोटो आणि व्हिडिओ तसेच सेल्फीही चाहत्यांसोबत शेअर करतो. आता त्याने नवीन वर्षाचे स्वागतही खास अंदाजात केले आहे. त्याने एक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऋतिक झाला शर्टलेस
ऋतिकने (Hrithik Roshan) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका याटवरील शर्टलेस फोटो शेअर केला आहे. यामध्ये चाहत्यांना त्याच्या जबरदस्त बॉडीचे दर्शन होत आहे. फोटोच्या बॅकग्राऊंडला समुद्राचे निळेशार पाणी दिसत आहे. काळा चष्मा लावून ऋतिक खूपच कूल दिसत आहे.

हा फोटो शेअर करत त्याने “२०२२… चला हे मजेशीर पद्धतीने जगूया,” अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे. ऋतिकच्या या फोटोला आतापर्यंत १८ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, १० हजारांहून अधिक कमेंट्सचाही वर्षाव झाला आहे.

दिग्दर्शक- निर्माता करण जोहरने ऋतिकच्या या पोस्टवर ‘दुगू’ अशी कमेंट केली आहे. याव्यतिरिक्त एका चाहत्याने त्याच्या फोटोवर कमेंट करत लिहिले की, “आग लावून टाकली आहे.” तसेच आणखी एका चाहत्याने लिहिले की, “हा तर मुलांचाही क्रश आहे.” याव्यतिरिक्त त्याच्या महिला चाहतीने लिहिले की, “आता झोपायलाच चालले होते की, तुझ्या पोस्टची नोटिफिकेशन आली, आता झोप येणार नाही.” अशाप्रकारे चाहते फायर इमोजी कमेंट्सचा पाऊस पाडत  आहेत.

यापूर्वी ऋतिकने आणखी एक शर्टलेस सेल्फीतील फोटो शेअर केला होता. यामध्ये त्याने डोक्यावर टोपी परिधान केली होती. त्याच्या टोपीवर ‘कॅलिएंट’ असे लिहिले होते. कॅलिएंट म्हणजे स्पॅनिशमध्ये हॉट किंवा गरम होय.

त्याने हा फोटो शेअर करताच त्याच्या चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी फायर इमोजी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली होती.

ऋतिकचे आगामी सिनेमे
ऋतिकच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘विक्रम वेधा’च्या रिमेकची शूटिंग करत होता. यामध्ये त्याच्यासोबत सैफ अली खानही आहे. सेटवरून एक पोस्ट शेअर करत त्याने लिहिले होते की, “हीरो २ वर्षांनंतर सेटवर जातोय. मी त्याच्यासमोर चालत आहे. यासाठी वाट पाहा.”

याव्यतिरिक्त ऋतिक दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही झळकणार आहे. दोघेही पहिल्यांदाच सिद्धार्थ आनंद एल राय यांच्या ऍक्शन चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट २०२३ मध्ये मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा