Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

सध्या बॉलिवूडमध्ये फिटनेसबाबत मोठी क्रेझ आहे. अनेकजण फिटनेसचे दिवाणे आहेत. प्रत्येक कलाकार आपल्या शरीराची काळजी घेतात. अशा बाबतीत सुपरस्टार ऋतिक रोशन सुद्धा कोणापेक्षा कमी नाही. तो त्याचा व्यायाम आणि आहाराची पूर्ण काळजी घेतो. नुकत्याच समोर आलेल्या त्याच्या नवीन फोटोमध्ये ऋतिक त्याचे बायसेप्स दाखवताना दिसत आहे. त्याची जबरदस्त फिटनेस पाहून कलाकारांच्या आणि चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ऋतिक रोशनने ब्लॅक एँड व्हाईट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बायसेप्स फडकताना दिसतो. हा फोटो शेअर करत त्याने ‘बोले बॉलिवूड बायसेप की जय’ असे लिहिले. त्याचे शरीर पाहून रोहित बोस रॉय स्तब्ध झाले. त्याने प्रतिक्रिया देत ‘OMG’ असे लिहिले. तसेच टायगर श्रॉफने इमोजी पोस्ट केले, तर विद्युत जामवालने “कला आणि कलाकार,” अशा कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. याव्यतिरिक्त चाहत्यांनीही इमोजीसह फोटोला सकारात्मक प्रतिसाद देखील दिला आहे.

ऍक्शन मोडमध्ये दिसणारा अभिनेता
ऋतिकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरीवर काही फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यात तो ऍक्शन मोडमध्ये दिसत आहे. त्याने या फोटोसोबत “ऍक्सनसाठी तयार,” असे लिहिले. दुसऱ्या फोटोत त्याने “पुढे जा, मला पंच मार,” असे लिहिले. त्याच्या या जबरदस्त कॅप्शनने असे दिसते की, ऋतिकने जिममध्ये खूप घाम गाळला आहे.

टायगरच्या फिटनेसची केली स्तुती
ऋतिक अनेकदा त्याच्या वर्कआउट सेशनचे व्हिडिओ शेअर करतो. टायगर श्रॉफच्या फिटनेसवरही तो प्रतिक्रिया देतो. त्याने टायगरच्या स्टंटचे अनेकवेळा कौतुक केले आहे. ऋतिक शेवटचा ऍक्शन ड्रामा वॉरमध्ये दिसला होता. यामध्ये, टायगरसोबत त्याच्या ऍक्शन, स्टंट आणि नृत्याच्या स्टेप्स चित्रपटात दुहेरी होत्या. त्याचा आगामी चित्रपट ‘फायटर’ आहे. ज्यात तो दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा