बॉलिवूडसाठी मागील एक वर्षापासून जणू काही दु:खाचा डोंगरच कोसळत आहे. कोरोनामुळे, तर वेगळ्याच आजारामुळे कलाकार या जगाचा निरोप घेत आहे. यासोबतच त्यांच्यासोबत काही कलाकार असेही आहेत, ज्यांनी आपले मॅनेजर, मेकअप आर्टिस्टला गमावले आहे. अशातच आता नुकतेच वृत्त आले आहे की, दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांचे मेक आर्टिस्ट शशि दादा यांचे निधन झाले आहे. याची माहिती स्वत: त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. विशेष म्हणजे शशि दादा हे जॅकी यांच्यासोबत ३७ वर्षांपासून काम करत होते.
जॅकी श्रॉफ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती देत लिहिले की, “शशि दादा नेहमीच माझ्या हृदयात राहतील. ३७ वर्षे माझ्यासोबत असणाऱ्या मेकअप आर्टिस्टचे निधन झाले आहे.”
त्यांच्या या ट्विटनंतर युजर्सही यावर प्रतिक्रिया देत आहेत. सोबतच अभिनेत्याचे चाहतेही आपला शोक व्यक्त करत आहेत. तब्बल ३७ वर्षे शशि दादा जॅकी यांच्यासोबत काम करायचे. त्यामुळे आता त्यांच्या जाण्याने जॅकी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जॅकी श्रॉफ यांनी आपल्या ट्विटमध्ये शशि दादा यांचा फोटोचाही समावेश केला आहे. फोटोत ते दोघेही एकसोबत दिसत आहेत. ते शशि दादा यांच्याशी काहीतरी बोलताना दिसत आहेत. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, त्यांच्यासोबत जॅकी यांचे किती घट्ट नाते झाले होते. दोघांमध्ये केवळ व्यावसायिकच नाही, तर वैयक्तिक संबंधही होते.