Saturday, June 29, 2024

मोठी बातमी! जॅकी श्रॉफ यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे केली तक्रार; म्हणाले, ‘शिक्षा द्या…’

सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांची भेट घेतली. यामध्ये सुनील शेट्टी याच्यापासून ते जॅकी श्रॉफ यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांचा समावेश होता. यावेळी प्रत्येकाने सिनेमाशी संबंधित मुद्द्यांवर वेगवेगळी मते मांडली. यादरम्यान जॅकी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे खास विनंती केली. त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर अनेकांनी प्रशंसा केली आहे.

जॅकी श्रॉफ यांची विनंती आहे तरी काय?
जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी त्यांच्या खास अंदाजात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, “मुंबईत तुमचे स्वागत आहे. नेहमी घरचे जेवण खाल्ले पाहिजे. फक्त आदेश द्या, मिळून जाईल.” यानंतर 65 वर्षीय जॅकी यांनी त्यांना विनंती केली की, चित्रपटगृहाच्या बाहेर पॉपकॉर्न खूपच महाग मिळतात. त्यांची किंमत कमी केली जावी. ते म्हणाले, “थिएटरच्या पॉपकॉर्नची किंमत कमी करा सर. पॉपकॉर्नचे 500 रुपये घेतात.”

‘अशी शिक्षा ठेवा की, इतकेच खाऊ शकतील’
जॅकी श्रॉफ पुढे बोलताना म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा चित्रपटगृह बनेल, तेव्हा त्यामध्ये असा दंड ठेवा की, इतकेच खाता येईल. खावा, पण पोट फुटू देऊ नका. खावा आणि खाऊ घाला, पण इतके कसे काय खाऊ शकतात राव. सिनेमे बनतील, स्टुडिओ बनतील, पण आत कोण जाणार?”

बॉयकॉट बॉलिवूडवर बोलला सुनील शेट्टी
सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने योगी आदित्यनाथांकडे बॉयकॉटबद्दल विनंती केली. तो म्हणाला, “प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये बोलावणे गरजेचे आहे. #BoycottBollywood हे जे सुरू आहे, ते तुम्ही सांगितल्यावरच थांबू शकेल. एक घाणेरडा मासा सर्वात असतो, पण त्या सर्वांमध्ये तुम्ही आम्हाला मोजू शकत नाही की, आम्ही सर्वजण असेच आहोत. सध्या प्रेक्षकांच्या डोक्यात एवढेच आहे की, हिंदी सिनेमा चांगली जागा नाहीये.”

आता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी या दिग्गजांच्या विनंतीनंतर योगी आदित्यनाथ काय पावलं उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (actor jackie shroff plea to cm yogi adityanath to get cinemas to lower popcorn price)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तु वेडी आहेस का?’ सारा अली खानच्या जोकवर भडकला रितेश देखमुख,पाहा व्हायरल व्हिडिओ
कमाईत भल्याभल्यांना मागे टाकणाऱ्या ‘युट्यूबचा बादशाह’ भुवन बामची नेट वर्थ आहे तरी किती? जाणून घ्याच

हे देखील वाचा