ज्या विद्यार्थिनींना शिकवायचा, त्यांच्याशीच ठेवायचा लैंगिक संबंध, खुद्द अभिनेत्यानेच केलाय धक्कादायक खुलासा


कलाकार कोणत्याही चित्रपटसृष्टीतील असो, त्यांच्यात कोणती ना कोणती वाईट सवय असतेच. मात्र, काही कलाकारांच्या सवयी या विचित्रच असतात, ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत येतात. अशाच एका सवयीमुळे हॉलिवूड अभिनेता चर्चेत आला आहे. तो म्हणजे ‘स्पायडरमॅन’ फेम जेम्स फ्रँको होय. ‘स्पायडरमॅन’ चित्रपटामुळे जगभरात प्रसिद्ध असलेला हाच अभिनेता आज एका वाईट सवयीमुळे माध्यमांमध्ये चर्चेत आहे.

खरं तर, ४ वर्षांपूर्वी जेम्स फ्रँकोवर (James Franco) लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याने यावर मौन सोडत वक्तव्य केले आहे. धक्कादायक खुलासे करत त्याने सांगितले आहे की, मागील अनेक वर्षांपासून तो सेक्स ऍडिक्शनचा शिकार झाला असून यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.

जेम्स फ्रँको त्याच्याच अभिनय शाळेतील काही विद्यार्थिनींसोबत ‘वन नाईट स्टँड’ करायचा. काही वर्षांपासून तो या वाईट सवयीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. जेम्स फ्रँकोने एका मुलाखतीत सांगितले की, ज्या विद्यार्थिनींना तो शिकवायचा, त्यांच्यासोबतच तो झोपायचा, जे चुकीचे होते. त्याने लैंगिक व्यसनामुळे शाळा सुरू केली नसल्याचेही सांगितले.

त्याला कोणत्याही विद्यार्थीनीला आकर्षित करायचे नव्हते. जेम्स फ्रँको म्हणाला की, “त्यावेळी माझा विचार असा होता की, एखादी गोष्ट परस्पर संमतीने किंवा इच्छेने होत असेल, तर ते ठीक आहे, त्यात चुकीचे काय आहे. कदाचित मी त्यावेळी स्पष्ट नव्हतो.”

सन २०१८ मध्ये पाच महिलांनी जेम्स फ्रँकोवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. यापैकी चार स्टुडिओतील विद्यार्थिनी होत्या, त्यानंतर ही शाळाही बंद करण्यात आली होती. त्यानंतर सन २०१९ मध्ये यापैकी २ महिलांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात म्हटले गेले होते की, जेम्सने त्या तरुण महिलांचा फायदा उचलला आहे.

सन २०१४ मध्ये या अभिनय शाळेची सुरुवात केली होती आणि त्यानंतर ते बंदही करण्यात आले होते. फ्रँकोने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा करत म्हटले की, “२०१८ मध्ये माझ्याविरुद्ध काही गुन्हे दाखल केले होते, आणि एक लेखही आला होता. त्यावेळी मला एवढेच वाटले की, मी शांत राहावे. त्यावेळी मला काही बोलणे योग्य वाटले नाही. काही लोक माझ्यावर रागावले होते आणि त्यावेळी माझे कोणी ऐकले नसते.”

“एक काळ असा होता की, मी दारू पिणे सोडले होते, पण मला सेक्सचे व्यसन लागले होते. मी मीटिंगला जायचो, लोकांना मदत करायचो. मला वाटत होते की, मी ठीक आहे, पण मी जगासमोर आणि स्वत:समोर अभिनय करत होतो.”

“मला गोष्टी नीट पाहता येत नव्हत्या. मी पॉवर डायनॅमिक्सच्या पलीकडे होतो. जेव्हा मला सेक्सचे व्यसन लागले, तेव्हा मी लोकांच्या भावनांशी खेळत आहे हे मला दिसत नव्हते,” असे तो पुढे बोलताना म्हणाला.

जेम्स फ्रँको हा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने हॉलिवूडमधील एकूण १४७ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो शेवटचा ‘किल द झार’ या चित्रपटात झळकला होता.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!