Tuesday, August 5, 2025
Home हॉलीवूड जेनिफर लोपेझ अन् बेन अफ्लेक जोडी १८ वर्षांनंतर एकत्र; व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमधील किसिंग व्हिडिओ व्हायरल

जेनिफर लोपेझ अन् बेन अफ्लेक जोडी १८ वर्षांनंतर एकत्र; व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमधील किसिंग व्हिडिओ व्हायरल

अमेरिकन कलाकार जोडी जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेक तब्बल १८ वर्षांनंतर व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर एकत्र आले. यावेळी त्यांना पाहणाऱ्यांचे तोंड उघडेच्या उघडेच राहिले. यादरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.

यावेळी जेनिफर पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये प्रचंड सुंदर दिसत होती, तर दुसरीकडे बेन अफ्लेक क्लासिक आणि शार्प टक्सिडोमध्ये नेहमीप्रमाणे हँडसम दिसत होता.\

https://www.instagram.com/p/CTpyzPFqUzj/?utm_source=ig_web_copy_link

व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द लास्ट ड्युएल’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी शुक्रवारी (१० सप्टेंबर) रोजी बेन अफ्लेक आपल्या लेडी लव्ह जेनिफरसोबत रेड कार्पेटवर उतरला होता. दोघांच्या रोमँटिक जोडीने फेस्टिव्हलमध्ये ‘चार चाँद’ लावले.

https://www.instagram.com/p/CTp2fsIKQNg/?utm_source=ig_web_copy_link

जेनिफर आणि बेन एकमेकांना बोलताना, हसताना, मिठी मारताना आणि किस करताना दिसले. यासोबतच जेनिफर आणि बेन यांनी शुक्रवारी रात्री त्यांचे नाते अधिकृतरीत्या जाहीर केले.

https://twitter.com/gwendalupe/status/1436417956918046721

जेनिफरने वयाच्या ५२ व्या वर्षी रेड कार्पेटवर स्लिट गाऊनमध्ये आपला जलवा दाखवला. जेनिफर आणि बेन १८ वर्षांनंतर एकमेकांना डेट करत आहेत. चाहत्यांना आशा आहे की, आता ही जोडी नेहमी एकत्र राहील. यापूर्वी जेनिफर आणि बेनने त्यांचे नाते वैयक्तिक ठेवले होते. रिलेशनशिपमध्ये परत आल्यानंतर जेनिफर आणि बेन यांची व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिली उपस्थिती होती.

यापूर्वी, जेनिफर लोपेझने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी इंस्टाग्राम अकाऊंटवरून बेन अफ्लेकशी आपले अधिकृतरीत्या जाहीर केले होते. यापूर्वी जेनिफर आणि बेन २००३ मध्ये व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पहिल्यांदा एकत्र उतरले होते. त्यावेळी दोघांनी साखरपुडा केला होता, पण २००४ मध्ये दोघे वेगळे झाले.

व्हेनिस आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये जेनिफर आणि बेनचे आकर्षक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. जेनिफर आणि बेनच्या फॅन फेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला लाज वाटत नाही का?’, गहना वशिष्ठच्या न्यूड फोटोवर नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

-‘माझ्या सर्वस्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा’, म्हणत सिद्धार्थने पत्नी मितालीला केले विश

-आहा…किती ते देखणं रूप! प्रार्थना बेहेरेचे सुंदर फोटो पाहून चाहत्यांच्या बत्त्या गुल

हे देखील वाचा