Sunday, June 8, 2025
Home कॅलेंडर जितेंद्र वाढदिवस : डिजायनर नाही म्हणून घालायाचे पांढरे कपडे तिच स्टाईल पुढे बनली ओळख

जितेंद्र वाढदिवस : डिजायनर नाही म्हणून घालायाचे पांढरे कपडे तिच स्टाईल पुढे बनली ओळख

हिंदी मनोरंजन जगतातील अभिनेते आणि त्यांच्यासंबंधित एखादी गोष्ट त्यांच्या चाहत्यांना इतकी आवडते की ती त्यांची खास शैली पुढे त्यांच्या चाहत्यांसाठी फॅशनच होऊन जाते. असेच स्टायलिश अभिनेते म्हणून जितेंद्र (Jitendra)  यांचे नाव म्हणून ओळखले जातात. आपल्या खास डान्स शैलीसाठी ते विशेष ओळखले जायचे. अभिनेते जितेंद्र यांचा जन्म 7 एप्रिल 1942 पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला.आज (7, एप्रिल) जितेंद्द यांचा वाढदिवस. जाणून घेऊ या त्यांच्या खास शैलीबद्दल. 

जितेंद्र हे हिंदी चित्रपट जगतातील एक आघाडीचे प्रतिभावान अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी 60 ते 70 च्या दशकात जोरदार वर्चस्व निर्माण केले होते. प्रत्येक अभिनेत्याची, कलाकाराची खास शैली जशी त्याच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असते  किंवा चर्चेत असते तशीच अभिनेते जितेंद्र यांची पांढरे कपडे घालण्याची स्टाईल चर्चेत होती. ते नेहमीच पांढऱ्या कपड्यांमुळे चर्चेत होते. पांढरा शर्ट, पांढरी पॅंन्ट, आणि बुटही पांढरेच असा त्यांचा खास पोशाख त्या काळात चांगलाच चर्चेत आला होता. आजही ते अनेकदा त्यांच्या या आवडत्या कपड्यात वावरताना दिसत असतात. त्यांच्या या खास शैलीमागचे कारण सांगताना त्यांनी एका मुलाखतीत महत्वाचा खुलासा केला होता.

एका मुलाखतीत जितेंद्र यांना “तुम्हाला हा पांढऱ्या रंगातील पेहराव का आवडतो?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी “त्याकाळात जास्त फॅशन डिजायनर वगैरे उपलब्ध नसायचे. त्यामुळे मी मनाला येईल ते कपडे घालायचो त्यावेळी मला कोणीतरी अशा पांढऱ्या कपड्यात तुम्ही खूप उंच आणि राजबिंडे दिसता असे सांगितले होते तेव्हापासून मी पांढरे कपडे घालायला सुरूवात केली,” अशी प्रतिक्रिया दिली होती. अभिनेते जितेंद्र यांना लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याची आवड होती. त्यांचे वडील त्या काळातील प्रसिद्ध दिग्दर्शक व्हि.शांताराम यांच्या घरी सोने पाठवायचे काम करायचे त्यावेळी व्ही.शांताराम यांना जितेंद्र यांच्या वडिलांनी मुलाला चित्रपटात काम देण्याची शिफारस केली होती. त्यामुळे काही दिवसांनी व्ही. शांताराम यांनी जितेंद्र यांना पहिल्या चित्रपटाची संधी मिळवून दिली.

चित्रपटात काम मिळाल्याने अभिनेते जितेंद्र खूपच आनंदी झाले होते. त्यांना या चित्रपटात राजकुमाराची भूमिका साकारायची असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र जेव्हा त्यांना हीच भूमिका अनेक लोक साकारणार असल्याचे समजले तेव्हा ते खूप उदास झाले. मात्र त्यांनी हार न मानता अशाच छोट्या मोठ्या भूमिका करत यशाचे शिखर गाठले. त्यांनी ‘हिम्मतवाला’, ‘नागिण’, ‘जुदाई’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली होती. त्यांचे हे चित्रपट पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. (actor jitendra birthday know about her)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘फकाट’चे हायली कॉन्फिडेन्शिअल टीझर प्रदर्शित

हॉट फोटोंसाठी ट्रोल झाली उर्वशी रौतेला; युजर्स म्हणाले, ‘ऋषभ पंतची 16 हाडे तुटली अन्…’

हे देखील वाचा