Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड जितेंद्र यांच्या हिरोइन्ससोबत ‘असे’ कृत्य करायची मुलगी एकता कपूर, शूटिंग सेटवर तिच्यासाठी होती ‘नो एंट्री’

जितेंद्र यांच्या हिरोइन्ससोबत ‘असे’ कृत्य करायची मुलगी एकता कपूर, शूटिंग सेटवर तिच्यासाठी होती ‘नो एंट्री’

‘द कपिल शर्मा’ शो हा छोट्या पडद्यावरील असा एक शो आहे, जो प्रेक्षकांच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर हास्य आणतो. या शोमध्ये अनेक मोठे सेलेब्स सहभागी होतात. ज्यांच्यासोबत कपिल शर्मा (Kapil Sharma) खूप मस्ती करतो. या जोक्स आणि संभाषणांमध्ये अनेक स्टार्सच्या न ऐकलेल्या कथा देखील समोर येतात. ज्यांच्या व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता असाच एक किस्सा एकता कपूरशी (Ekta Kapoor) संबंधित समोर आला आहे.

इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो कॉमेडियन कपिल शर्माच्या शोचा आहे. टीव्हीची क्वीन आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूर तिचे वडील आणि अभिनेते जितेंद्र (Jitendra) यांच्यासोबत शोमध्ये आल्याचे दिसत आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचल्यानंतर हे स्टार्स जुने किस्से सांगताना दिसतात. दरम्यान, एकता स्वतःबद्दलची एक घटना उघड करते आणि सांगते की, ती तिच्या वडिलांबद्दल किती सकारात्मक आणि संरक्षणात्मक असायची. त्याचवेळी, ती असेही सांगते की, वडील जितेंद्र यांना कोणत्याही अभिनेत्रीसोबत शूटिंग करताना पाहणे तिला आवडत नव्हते. त्यामुळे एकताला जितेंद्र यांच्या चित्रपटांच्या शूटिंगवर येऊ दिले जायचे नाही.

ती म्हणते की, “मला त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर जाण्याची परवानगी नव्हती. कारण मी त्यांच्या नायिकांवर हल्ला करू शकते. माझ्या वडिलांसोबत कोणी काम करू नाही, मला खूप हेवा वाटत होता. वडिलांशी कोणी बोलणे मला अजिबात आवडत नव्हते.”

एकताचे बोलणे ऐकून जितेंद्र यांनी आपल्या मुलीशी संबंधित आणखी खोडसाळपणा उघड केला. त्यांनी एकताच्या शाळेतील एक किस्सा सांगितला जेव्हा ती ६-७ वर्षांची होती. जितेंद्र म्हणाले की, “एकदा मला इमारतीच्या गच्चीवर बोलावून सांगितले की, मुले रामायणावर कार्यक्रम करत आहेत. माझी मुलगी अभिनेत्री बनत आहे, हे ऐकून मी ते नाटक बघायला गेलो होतो. मी तिथे गेलो आणि एकता कुठे आहे विचारू लागलो. तेवढ्यात आवाज आला पापा, मी इथे आहे, मी रावण बनली आहे.”

जितेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप मेहनत घेतली होती. त्यानंतर १९६७ मध्ये जितेंद्र यांना ‘फर्ज’ चित्रपटातून एक नवीन ओळख मिळाली. या चित्रपटातील ‘मस्त बहारों का मैं आशिक’ हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. अशा प्रकारे जितेंद्र ‘जंपिंग जॅक’ बनले होते. यानंतर त्यांनी ‘हमजोली’ आणि ‘कारवां’ यांसारखे चित्रपट केले आणि ते सुपरस्टार बनले.

हेही वाचा

हेही पाहा-

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा