Monday, February 24, 2025
Home हॉलीवूड पहिल्या पत्नीने केलेल्या हिंसाचाराच्या आरोपांवर जॉनी डेप म्हणाला, ‘खोट्याला सिद्ध करू शकत नाही”

पहिल्या पत्नीने केलेल्या हिंसाचाराच्या आरोपांवर जॉनी डेप म्हणाला, ‘खोट्याला सिद्ध करू शकत नाही”

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पहिली पत्नी एंबर हर्ड यांच्यासोबत मागील बरीच काळापासून कायेदशीर वाद चालू आहे. जॉनीने एम्बरवर त्याची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप करत तिच्यावर ५० मिलियन डॉलरचा मानहानीचा दावा ठोकला. या केसवर सध्या अमेरिकेत सुनावणी चालू आहे. जॉनी डेपने एंबर हर्डने त्याच्यावर जे आरोप लावले त्यावर स्पष्टीकरण देताना ते सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे.

एका रिपोर्टनुसार डेपने सांगितले की, “खोटे खोटेच असते, आणि कधी ना कधी खरे समोर येतेच. खोट्याला तुम्ही कधीच सिद्ध करू शकत नाही.” आपल्या वकिलांच्या माध्यमातून त्याने या सर्व आरोपांना खोटे सांगितले आहे. त्याने हे देखील सांगितले की, “मी एंबर किंवा कोणत्याही इतर महिलेसोबत हिंसक कृत्य केले नाही.” एंबर हर्डने त्यांच्या नात्यामध्ये अनेकदा जॉनीवर मारहाण केल्याचा आरोप लावला. सोबतच तिचा गळा दाबण्याचा आणि तिला लाथ मारल्याचे देखील तिने सांगितले. एवढंच नाही तर एंबर हर्डने सांगितले की, ते ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्यांसाठी गेले असताना जॉनीने तिचे यौन शोषण केले आणि तिच्या खासगी भागात दारूची बाटली देखील टाकली होती. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतर हे प्रकरण संपेल असे सर्वांना वाटले होते, मात्र २०१८ साली एंबर हर्डने एक ओपन पत्र पब्लिश केले ज्यात तिने नाव न घेता जॉनीवर अनेक आरोप लावले होते. त्यानंतर जॉनीने तिच्यावर ५० मिलियन डॉलरचा दावा ठोकला. डेपने सांगितले होते की, त्याने फक्त स्वतःसाठीच उभे राहणे योग्य समजले असे नाही तर मुलांसाठी देखील उभे राहायचे ठरवले. जेव्हा त्याचे मुलं शाळेत जातील तेव्हा त्यांना या गोष्टींवर लाज वाटायला नको. त्याच्या विरोधात केलेले आरोप खूपच गंभीर आणि त्रासदायक होते. यासाठी त्याने हे पाऊल उचलले. तो म्हणाला की, सुरुवातील एंबर खूपच चांगली होती, त्याच्यावर प्रेम करायची खूपच चांगली व्यक्ती होती, मात्र काही वर्षांमध्ये तिच्यात मोठा बदल झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा