Monday, February 24, 2025
Home हॉलीवूड बाबो! जॉनीने पुन्हा ‘जॅक स्पॅरो’ बनावे म्हणून डिझ्नीने मागितली माफी? दिली ‘इतक्या’ हजार कोटींची ऑफर

बाबो! जॉनीने पुन्हा ‘जॅक स्पॅरो’ बनावे म्हणून डिझ्नीने मागितली माफी? दिली ‘इतक्या’ हजार कोटींची ऑफर

चाहत्यांना कलाकारांच्या फीबद्दल खूपच उत्सुकता लागलेली असते. तसं पाहिलं, तर बॉलिवूडमधील सुपरस्टार कलाकारांची एका सिनेमासाठीची फी ही जवळपास ६० ते १०० कोटींच्या दरम्यान असल्याचे म्हटले जाते. मात्र, जर तुम्हाला असे सांगितले की, एका अभिनेत्याला सिनेमाची ऑफर ही तब्बल दोन हजार कोटींहून अधिक रुपयांची मिळाली आहे. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरं आहे. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत तो हॉलिवूड अभिनेता आहे.

जॉनी डेपला मिळाली २३५५ कोटी रुपयांची ऑफर
हॉलिवूडमधील सुपरस्टार जॉनी डेप (Johnny Depp) या अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्य मागील काही दिवसांपासून खूपच चर्चेत होते. जॉनीला त्याची एक्स पत्नी एंबर हर्डविरुद्ध मानहाणीच्या प्रकरणात यश आले होते. यानंतर जॉनीचे आयुष्य पुन्हा एकदा रुळावर परतले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, डिझ्नीने जॉनी डेपला एक माफी पत्र पाठवले आहे. सोबतच पायरेट्स ऑफ द कॅरिबियन (Pirates Of The Caribbean) यामधील जॅक स्पॅरो (Jack Sparrow) या भूमिकेसाठी त्याला २३५५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.

तब्बल ३०१ मिलियन डॉलरची ऑफर
माध्यमांतील वृत्तानुसार, जॉनी डेप याला डिझ्नीने एक माफी पत्र पाठवले आहे. यासोबतच जॉनीला सुपरहिट फ्रँचायझी ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’मध्ये जॅक स्पॅरोच्या भूमिकेसाठी तब्बल २३५५ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे, हॉलिवूडच्या या सुपरहिट फ्रँचायझीच्या एकूण ५ भागांसाठी जॉनी डेप याने, कॅप्टन जॅक स्पॅरो ही भूमिका साकारली आहे.

जॅक स्पॅरो बनून परतणार जॉनी?
माध्यमांतील वृत्तानुसार, एका जवळच्या सूत्राने सांगितले की, “मला माहित आहे की, कॉर्पोरेटने त्याला भेटवस्तूसह एक पत्र पाठवले आहे, परंतु ते अभिनेत्याला कसे पाठवले गेले याची मला खात्री नाही. मी तुम्हाला सांगू शकतो की, स्टुडिओने जॅक स्पॅरोचा ड्राफ्ट तयार केला आहे. आशा आहे की, जॉनी त्यांना माफ करेल आणि या पात्रासाठी परत येईल.”

मात्र, याची अधिकृत पुष्टी झाली नाहीये. जॉनीबद्दल सांगायचं झालं, तर काही काळापूर्वी जॉनीकडून अनेक सिनेमे काढून घेण्यात आले होते. असे म्हटले जाते की, ‘फँटास्टिक बीस्ट ३’ आणि ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ यांसारख्या सिनेमांमधून निर्मात्यांनी जॉनीसोबत करार करण्यास नकार दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा