Friday, July 5, 2024

धक्कादायक! जुनियर एनटीआरने ‘या’ कारणासाठी केली पुढे चित्रपट साइन न करण्याची घोषणा

दाक्षिणात्य अभिनेता जुनियर एनटीआर हा ना केवळ साऊथ इंडस्ट्रीमध्ये तर संपूर्ण भारतात नव्हे नव्हे जगात लोकप्रिय आहे. त्याला मोठी फॅन फॉलोविंग आहे. त्याचे सिनेमे नेहमीच लोकप्रियतेचे, कमाईचे विविध रेकॉर्ड करत असतात. जुनियर एनटीआर हा या ना त्या कारणामुळे सतत लाइमलाईट्मधे असतो. नुकताच त्याच्या आरआरआर या सिनेमाला ऑस्कर मिळाला. त्यामुळे सध्या तो प्रकाशझोतात आहे. जुनियर एनटीआरच्या प्रत्येक चित्रपटाची लोकं आतुरतेने वाट बघत असतात. आता तो लवकरच कोणत्या सिनेमात दिसणार हा प्रश्न सध्या प्रेक्षक विचारताना दिसत आहे. मात्र जुनियर एनटीआरने तो आता कोणताही सिनेमा साइन करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान सध्या जुनियर एनटीआर हा त्याच्या आगामी ‘जुनियर 30’ या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. कोरताला शिवा यांच्या या सिनेमाबद्दल लोकांना अधिक जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे या सिनेमाबद्दल त्याला सतत विचारले जात आहे.मात्र लोकांच्या सततच्या या प्रश्नामुळे तो आता हैराण झाला आहे. त्यामुळे त्याने सांगितले आहे की, लोकं असेच सतत विचारणार असतील तर तो चित्रपट करणे बंद करेल. त्याने हे देखील स्पष्ट केले की अजून कोणताही नवीन सिनेमा त्याने साइन केलेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

मात्र जुनियर एनटीआर लगेचच सांगितले की तो फक्त एक मजाक करत आहे. अजून त्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचा असा कोणताच निर्णय घेतलेला नाही. ‘जुनियर 30’ या सिनेमातून अभिनेत्री जान्हवी कपूर तेलगू इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. हा सिनेमा २०१४ सालात एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल दाक्षिणात्य इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील मोठा बज तयार झाला आहे. या सिनेमाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण करणारी बाब म्हणजे जान्हवी कपूरचा पहिला तेलगू सिनेमा. आता सगळ्यांचे लक्ष याच सिनेमाकडे लागले आहे.

तत्पूर्वी जुनियर एनटीआरच्या आरआरआर सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमात जुनियर एनटीआरसोबत रामचरण मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पॅपराझींना पोज दिल्याने सैफ करीनावर रागावला? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
रजनीकांत यांच्या मुलीचे लग्नातील लाखोंचे दागिने चोरीला; ‘या’ व्यक्तिवर व्यक्त केला संशय

हे देखील वाचा