एसएस राजामौली हे भारतीय चित्रपटसृष्टीतील अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत, जे आपले काम चोखपणे करण्यासाठी काहीही करू शकतात. ‘बाहुबली’ सारखा चित्रपट करून त्यांनी संपूर्ण देशातील सिनेप्रेमींना पटवून दिले आहे. त्यांच्या चित्रपटांमधून परिपूर्णता आणि संशोधन चांगले दिसून येते. एका मुलाखतीदरम्यान, ‘आरआरआर’ चित्रपटाचा स्टार ज्युनियर एनटीआरने (Junior NTR) खुलासा केला की, दिग्दर्शक एसएस राजामौली आपल्या फ्रिजमध्ये माश्या ठेवत असत. हाच मुद्दा समोर ठेवत राजामौली यांनी त्यामागचे कारण चाहत्यांना सांगितले.
एसएस राजामौली त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्यांच्या चित्रपटातील कलाकारांसह उपस्थित होते. तिथे उपस्थित असलेला सुपरस्टार ज्युनियर एनटीआरने त्याच्या पुरस्कार विजेत्या ‘ईगा’ चित्रपटाबाबत एक मनोरंजक खुलासा केला आहे. ज्युनियर एनटीआरने सांगितले की, “राजामौली त्यांच्या घरातील फ्रीजमध्ये माश्या ठेवत असत आणि जेव्हाही फ्रीज उघडला जातो तेव्हा तिथे अन्नापेक्षा जास्त माश्या आढळत असत. राजामौली यांनी ‘ईगा’ नावाचा चित्रपट बनवला होता, ज्याला हिंदीत ‘मक्खी’ असे नाव देण्यात आले होते आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.”
राम चरणने सांगितले फ्रीजमध्ये माश्या ठेवण्याचे कारण
ज्युनियर एनटीआरच्या या खुलाशाने तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्याचे उत्तर राम चरणने (Ram Charan) दिले. त्यावेळी राजामौली त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचे त्यांनी सांगितले. राजामौली हे हायबरनेशन प्रक्रियेवर संशोधन करत होते. म्हणजे अतिशीत तापमानाचा माशांवर काय परिणाम होतो. याच कारणामुळे राजामौली यांनी फ्रिजमध्ये माश्या ठेवल्या होत्या. तिथे उपस्थित सर्व लोक त्याच्या उत्तराने समाधानी दिसत होते, अगदी ज्युनियर एनटीआरही.
राजामौली हे दिग्गज दिग्दर्शक आहेत, त्यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘आरआरआर’ बनवण्यातही बराच वेळ घालवला. ते एखादे काम अतिशय काळजीपूर्वक पूर्ण करतात. राजामौली यांनी ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ सारखे बिग बजेट चित्रपट केले. त्यांनी यापूर्वी २०१२ मध्ये ‘ईगा’ हा फँटसी चित्रपट बनवला होता, तो त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. याशिवाय साऊथच्या फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट म्हणून त्याची निवड झाली.
हेही वाचा-










