Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड कबीर बेदींच्या नातीने मिनी स्कर्ट अन् क्रॉप टॉपमध्ये दाखवली परफेक्ट फिगर, पाहून चाहतेही झाले घायाळ

कबीर बेदींच्या नातीने मिनी स्कर्ट अन् क्रॉप टॉपमध्ये दाखवली परफेक्ट फिगर, पाहून चाहतेही झाले घायाळ

अभिनय क्षेत्रामध्ये अनेक कलाकारांच्या पिढ्यानपिढ्या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. दिग्गज अभिनेता कबीर बेदी यांनी सिनेसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट दिलेत. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांची नात अलाया फर्नीचरवाला देखील अभिनयामध्ये स्वतःचे नाव मोठे करत आहे. ती नेहमी तिच्या हॉट आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. नुकतेच तिला आपल्या हॉट अंदाजामध्ये काहींनी पहिले होते. तेव्हा देखील ती नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवरच तिचा ‘फ्रेडी’ हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अलाया महाबळेश्वरला तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती. व्हायरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्रीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे. तसेच हिरव्या रंगाचा मिनी स्कर्ट घातला आहे. तिचा हा परफेक्ट फिगर खूपच आकर्षक दिसत आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे. तिने यामध्ये अतिशय लाईट मेकअप केलेला आहे. तसेच तिच्या या नो मेकअप लूकवर चाहते फिदा झाले असून अनेकांनी तिला कमेंटमध्ये हार्ट इमोजी पाठवले आहेत. (Actor Kabir Bedi grandchild Alaya furniturewala show her perfect figure in mini skirt and crop top)

बाळासाहेब ठाकरेंच्या नातूबरोबर जोडले होते अभिनेत्रीचे नाव
काही दिवसांपूर्वी पूजा बेदी यांची मुलगी अलाया फर्नीचरवाला मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. तिचे नाव बाळा साहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरे बरोबर जोडले गेले होते. यावर तिचे चाहते कायम तिला ऐश्वर्य बरोबर असलेल्या संबंधांविषयी विचारायचे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने या विषयी खुलासा केला. ती म्हणाली की, “अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका. ऐश्वर्य माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो खूप चांगला आहे. अशा प्रकारच्या अफवांमुळे आमच्या मैत्रीच्या नात्याला ठेच पोहचत आहे. तो आणि मी अभिनय आणि डान्स क्लास साठी एकत्र जातो.”

अलाया फर्नीचरवालाच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास तीने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटामधून अभिनयास सुरुवात केली. सध्या ती ‘यू टर्न’ आणि ‘फ्रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असते. एकता कपूर यांनी काही दिवसांपूर्वी ‘फ्रेडी’ चित्रपटाचा टिझर शेअर केला होता. या चित्रपटामध्ये अभिनेत्रीसह कार्तिक आर्यन देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-आनंद गगनात मावेना! आधी बॉलिवूडमध्ये पदार्पण अन् आता ‘मल्टीप्लेक्स’चा मालक बनलाय विजय देवरकोंडा

-कपाळावर कुंकू लावून तुरुंगातून बाहेर निघाला राज कुंद्रा, ६४ दिवसांनी मिळाला जामीन

हे देखील वाचा