Sunday, February 23, 2025
Home हॉलीवूड Valentine Special | किम कार्दशियनला प्रभावित करण्यासाठी, कान्ये वेस्टने पाठवले ट्रकभर गुलाब

Valentine Special | किम कार्दशियनला प्रभावित करण्यासाठी, कान्ये वेस्टने पाठवले ट्रकभर गुलाब

कान्ये वेस्ट (Kanye West) किम कार्दशियनसोबतच्या (Kim Kardashian) घटस्फोटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. कधी अशी माहिती समोर येत आहे की, तो ज्युलिया फॉक्ससोबत पुढे गेला आहे, तर कधी बातमी येते की, त्याला किमसोबत रिलेशनशिपमध्ये परत यायचे आहे. आता बातमी येत आहे की, कान्ये किमला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने कान्येने किमला लाल गुलाबाचा एक मोठा पुष्पगुच्छ पाठवला होता. ज्यामध्ये लिहिले होते, ”माझी दृष्टी क्रिस्टलसारखी स्पष्ट आहे.”

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी कान्येच्या या वागण्यामुळे त्याचे आणि ज्युलिया फॉक्सचे ब्रेकअप झाल्याचीही बातमी समोर येत आहे. नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यानच दोघांची भेट झाली होती. पण नुकतेच ज्युलियाने कान्येसोबतचे तिचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केले आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, ज्युलिया आणि कान्ये चांगले मित्र आहेत आणि भविष्यात एकत्र काम करतील. पण आता दोघेही जोडपे म्हणून एकत्र नाहीत. तसे, किम सध्या पीट डेव्हिडसनसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. ते दोघे बराच वेळ एकत्र घालवत असून, काही दिवसांपूर्वी दोघांचा किस करतानाचा फोटोही व्हायरल झाला होता.

चार मुलांची आहे आई
किमने आतापर्यंत तीन लग्ने केली आहेत. तिने २००० मध्ये डेमन थॉमससोबत पहिले लग्न केले. २००४ मध्ये दोघेही वेगळे झाले. २०११ मध्ये ख्रिस हमपेरिसशी लग्न केले. २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. २०१४ मध्ये इटलीमध्ये लग्न केले होते. या जोडप्याला चार मुले आहेत. मोठ्या मुलीचे नाव नॉर्थ, मोठ्या मुलाचे नाव सेंट, लहान मुलीचे नाव शिकागो आणि मुलाचे नाव सॅम आहे. २०२० मध्ये दोघे वेगळे झाले होते.

हेही वाचा –

हेही पाहा-

 

हे देखील वाचा