अभिनेत्री बिपाशा बासू ही सध्या प्रेग्नंसीचा आनंद लुटत आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बेबी बंपमधील फोटो शेअर करत असते. अशात अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवरून स्पष्ट होते की, तिचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर हा वडील बनण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. खरं तर, अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडिओत करण तिच्या बेबी बंपजवळ जाऊन गाणे गाताना दिसत आहे.
अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) या जोडप्याचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. बिपाशाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “डॅड मोड. मुलासाठी गाणी गातोय, मुलासी बोलतोय, ज्याने गर्भात वाढत असलेल्या बाळाला चांगले वाटते.” अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
नेटकऱ्यांना आवडतोय व्हिडिओ
हा व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला. एकाने लिहिले की, “ओहह. बाबा किती गोड आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “खूप छान. शुभेच्छा…!” आणखी एकाने लिहिले की, “आनंदाश्रू येतायेत. हे किती सुंदर आहे. कुणाचीही नजर लागू नये.” बिपाशा आणि करण यांनी मागील आठवड्यात इंस्टाग्रामवर प्रेग्नंसीबद्दल घोषणा केली होती.
बेबी बंपसोबतचा फोटो केला होता शेअर
बिपाशाने तिच्या प्रेग्नंसी शूटचे फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करून तिने एक भली मोठी पोस्ट लिहिली होती. तिने लिहिले होते की, “एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, एक नवीन प्रकाश आपल्या जीवनात आणखी एक अद्वितीय प्रतिमा जोडतो. आम्हाला पूर्वीपेक्षा थोडे अधिक पूर्ण करते. आम्ही हे आयुष्य वैयक्तिकरीत्या सुरू केले आणि नंतर आम्ही एकमेकांना भेटलो. तेव्हापासून आम्ही दोघेच होतो. फक्त दोघांसाठी खूप प्रेम, आम्हाला थोडं चुकीचं वाटत होतं… म्हणून लवकरच, जे आम्ही दोन होतो ते आता तीन होणार आहोत. आमच्या प्रेमातून निर्माण झालेली रचना, आमचे बाळ लवकरच आमच्यासोबत आमच्या आनंदात सामील होईल.”
View this post on Instagram
‘या’ सिनेमाच्या सेटवर भेटले होते करण- बिपाशा
बिपाशा आणि करणबद्दल बोलायचं झालं, तर ते सन २०१५मध्ये ‘अलोन’ या सिनेमाच्या सेटवर भेटले होते. तेथूनच त्यांच्यात जवळीकता वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी एप्रिल २०१६मध्ये संसार थाटला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘थोडंही वजन वाढलेल्या अभिनेत्रीला प्रेक्षक सहजासहजी स्वीकारत नाहीत,’ सुबोधच्या प्रश्नावर काय म्हणाली ऋता?
कधीकाळी चॉकलेट-चिंगम आणि कॅसेट विकायचे मधुर भांडारकर, स्वत:वर विश्वास ठेवल्याने आज आहेत सुपरहिट दिग्दर्शक
भाईजानला बॉलिवूडमध्ये ३४ वर्ष पुर्ण, खास व्हिडिओ शेअर करत केली ‘ही’ मोठी घोषणा