प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर वोहरा याने त्याच्या अभिनयाने देशभरातील घराघरात ओळख निर्मान केली आहे. त्याच्या अभिनयाला चाहते जोरदार पसंती देतात. मात्र, आता या कलाकाराने केलेल्या कृत्याबद्दल ऐकले किंवा वाचले, तर कदाचित चाहत्यांनाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. करणवीर कायद्याच्या कचाट्यात सापडल्याचे दिसत आहे. करणवीरसोबतच ६ लोकांवर एका महिलेची १.९९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
या प्रकरणात करणवीर वोहरा (Karanvir Bohra) याच्यासह ६ लोकांवर ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्याविरुद्ध महिलेने तक्रार करत गुन्हा दाखल केला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, ४० वर्षीय महिलेने करणवीरसह ६ लोकांवर फसवणुकीचा आरोप लावला आहे.
Maharashtra | Case registered against 6 people including actor Manoj Bohra alias Karanvir Bohra for allegedly cheating a 40-year-old woman of Rs 1.99 crores after promising to return it at 2.5% interest; woman claimed that only an amount of over Rs 1cr was returned: Oshiwara PS
— ANI (@ANI) June 15, 2022
गोळी मारण्याची धमकी
महिलेने सांगितल्यानुसार, अभिनेत्याने तिला सांगितले होते की, २.५ टक्के व्याजाने संपूर्ण रक्कम परत केली जाईल. मात्र, एक कोटींहून थोडे अधिक रुपयेच त्यांनी परत केले. महिलेने असाही दावा केला की, जेव्हा तिने रक्कम मागितली, तेव्हा करणवीर आणि त्याची पत्नी तजिंदर सिद्धू यांनी योग्य संवाद न साधता कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. इतकेच नाही, तर महिलेला गोळी मारण्याचीही धमकी देण्यात आली.
पोलीस करणार तपास
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. तसेच, म्हटले जात आहे की, लवकरच करणवीर आणि तजिंदर यांचे जबाब नोंदवले जातील. करणवीर शेवटचा कंगना रणौत हिच्या ‘लॉकअप’ या शोमध्ये दिसला होता. तिथे त्याने आपल्याबद्दल खुलासा करत सांगितले होते की, पैसे परत न केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि तो कर्जाखाली बुडला आहे. त्याने म्हटले होते की, “जर माझ्या जागी इतर कुणी असते, तर त्याने आतापर्यंत आत्महत्या केली असती.”
करणवीर वोहराची अभिनय कारकीर्द
करणवीर वोहरा याच्या अभिनय कारकीर्दीबद्दल बोलायंचं झालं, तर त्याने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने काही सिनेमात काम केले आणि पुन्हा टीव्ही जगतात पाऊल ठेवले. अभिनेत्याने ‘कुसुम’, ‘क्या हादसा क्या हकीकत’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ यांसारख्या अनेक मालिकेत काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा राष्ट्रध्वजाचा अपमान’, अभिनेत्रीने क्रॉप टॉप घालून तिरंगा फडकावल्याने भडकले चाहते, शिकवला चांगलाच धडा
‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या रक्तातच देशभक्ती! भारतीय सैन्याशी आहे घट्ट नातं
पाकिस्तानात जन्मूनही भारताचे नागरिकत्व घेणारा अदनान सामी, चार लग्नांमुळे आलेला चर्चेत