बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या अभिनयासह त्याच्या मवाळ स्वभावामुळे देखील चर्चेत असतो. अशात चित्रपटांच्या प्रमोशनसह तो सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्तींशी नम्रपणे बोलताना दिसला आहे. सध्या त्याचे सार्वजनिक ठिकाणचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
कार्तिक रविवारी (१४ नोव्हेंबर) त्याच्या ‘धमाका’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीला रवाना झाला. यावेळी दिल्लीला जाण्यासाठी तो त्याच्या काळ्या लग्जरी गाडीतून मुंबई विमातळावर पोहचला. तिथे आल्यानंतर अनेक फोटोग्राफर त्याचे फोटो घेऊ लागले आणि त्याच्या चष्म्याचे तसेच त्याच्या गाडीचे कौतुक करू लागले. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधत कार्तिक म्हणाला की, “हो हो माझं शर्ट छान आहे, माझी पॅन्ट छान आहे, सर्वच छान आहे.”
सीआयएसएफ अधिकाऱ्यांना दिली लक्षवेधी प्रतिक्रिया
तसेच विमानतळावर उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक CISF सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी त्याच्या लँबोर्गिनी गाडीचे कौतुक केले. त्यावेळी कार्तिक त्यांना हात जोडून धन्यवाद बोलताना दिसला. त्याचा हा अंदाज अनेक चाहत्यांच्या मनाला भावला आहे. सोशल मीडियावर अनेक जण त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
रस्त्यावर खात होता चायनीज
काही दिवसांपूर्वीच कार्तिक त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस १५’च्या सेटवर पोहोचला होता. त्यावेळी पुन्हा परतत असताना त्याला चायनीज खायची इच्छा झाली. लगेचच त्याने गाडी रस्त्यावरील एका चायनीज हॉटेलच्या बाजूला लावली. त्यावेळी रस्त्यावर चायनीज खात असताना त्याने फोटोग्राफर आणि तेथील व्यक्तींशी संवाद साधला. त्याचा हा व्हिडिओ देखील त्याच्या चर्चेचे आणि कौतुकाचे कारण ठरला आहे.
कार्तिकचा ‘धमाका’ हा चित्रपट १९ नोव्हेंबर २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तो अर्जुन पाठक हे पात्र साकारणार आहे. ज्याचं एक लोकल चॅनल आहे. तसेच तो मुंबई बॉम ब्लास्टची एक बातमी ब्रेक केल्याने चर्चेत आलेला असतो. कार्तिककडे या चित्रपटासह आणखीन तीन चित्रपट आहेत. ‘भुल भुलैया २’ ‘फ्रेड्डी’ आणि ‘शेहजादा’ या चित्रपटामध्ये देखील तो झळकनार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?
-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’
-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे