Wednesday, June 26, 2024

कार्तिक आर्यनने थिएटरमध्ये पोहोचून चाहत्यांना केले आश्चर्यचकित, अभिनेत्याने शेअर केला मजेदार व्हिडिओ

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याच्या ‘भूल भुलैया 2‘ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. कार्तिकची ईतकी जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे की, चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. अशा परिस्थितीत अभिनेता स्वत: चाहत्यांमध्ये पोहोचला आणि मग काय? कार्तिकने त्याचा लेटेस्ट व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला, ज्यामध्ये तो प्रेक्षकांना भेटायला थेट थिएटरमध्ये पाेहचला आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन (kartik aaryan) अहमदाबादमध्ये एका थिएटरच्या उद्घाटनाला गेला होता. यावेळी कार्तिकला पाहून चाहते आनंदाने वेडे झाले. अभिनेत्याने स्वतः बनवलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कार्तिकला थिएटरमध्ये पाहून चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या आणि आपल्या आवडत्या अभिनेत्याचे जल्लोष करत स्वागत केले, अशा परिस्थितीत कार्तिक स्वतःच्या मोबाईलवरून चाहत्यांसोबत व्हिडिओ बनवताना दिसत आहे. त्याचवेळी थिएटरमध्ये चाहते त्याच्यासोबत व्हिडिओ बनवताना, फोटो काढतानाही दिसत होते.

अभिनेत्याची कूल स्टाईल पाहून चाहतेही प्रेमाची उधळण करत आहेत. कार्तिकचा सेल्फ मेड व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांचे आभार व्यक्त करताना कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘थिएटरमध्ये यशस्वी थिएटर ओपनिंगनंतर’ या व्हिडिओच्या बॅकग्राउंड एक गाणेही वाजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनच्या या स्टाईलने चाहते थक्क झाले आहेत आणि त्याचे जोरदार कौतुक करत आहेत. कोणी त्याला गोंडस, चॉकलेटी हिरो म्हणून कमेंट करत आहेत तर कोणी ‘आमच्या सुपरस्टारचा सुपरस्टारडम’ लिहित आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, ‘कार्तिक आर्यन आणि थिएटर्स, अ परफेक्ट मॅच.’

‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाच्या अफाट यशानंतर कार्तिक आर्यन सध्या त्याच्या नवीन चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ चे शूटिंग करत आहे. याशिवाय तो ‘फ्रेडी’ चित्रपटात डेंटिस्टच्या भूमिकेतही दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! सर्वांसमाेर रणवीरने दीपिकाला केले किस; व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

अरे देवा! 50 किलोच्या अभिनेत्रीने 31 किलोचा घातला लेहेंगा

हे देखील वाचा