Thursday, July 31, 2025
Home भोजपूरी यूट्यूबवर धमाल करतंय खेसारी अन् राणीचं ‘हे’ गाणं; मिळालेत तब्बल ‘इतके’ लाख हिट्स

यूट्यूबवर धमाल करतंय खेसारी अन् राणीचं ‘हे’ गाणं; मिळालेत तब्बल ‘इतके’ लाख हिट्स

भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी तिच्या डान्स बरोबरच तिच्या अभिनयासाठी देखील ओळखली जाते. ती आज करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. लोक तिच्या डान्सचे कौतुक करून थकत नाहीत. अभिनेत्री राणी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ती अनेकदा तिचे वर्कआऊट व्हिडिओ आणि फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. चाहत्यांना अभिनेत्रीची हा खास अंदाज खूप आवडतो. राणी भोजपुरी सिने इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. चित्रपट आणि व्हिडिओमध्ये काम करण्यासाठी ती चांगलेच मानधन घेते. अभिनेत्री आजकाल प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण तिचे एक जुने गाणे आहे.

‘बंगालीवाली जंगला से लाइन मारेली’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात राणी चॅटर्जी भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवसोबत दिसत आहे. दोघांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने गाण्यात चार चाँद लावले आहेत. या गाण्यात तिने शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. राणी चॅटर्जी आणि अभिनेता खेसारी लाल यादव यांचे हे गाणे यूट्यूबवर खूप पसंत केले जात आहे. चाहते कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत

भोजपुरी गाणे ‘बंगालीवाली जंगला से लाईन मारेली’ हे २०१६ मध्ये वर्ल्ड वाईड रेकॉर्ड्स भोजपुरी या यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले होते. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री या गाण्यात दिसते. या गाण्यात खेसारी आणि कल्पना यांनी त्यांच्या आवाजाची जादू पसरवली आहे. हे गाणे सुपरहिट भोजपुरी चित्रपट ‘जानम’ मधील आहे. खेसारी लाल यादव व्यतिरिक्त राणी चॅटर्जी, विराज भट्ट आणि पूनम दुबे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

या गाण्याला आतापर्यंत ३९ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १० हजारांपेक्षाही अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे.

राणी चॅटर्जी
राणीने २००३ मध्ये भोजपुरी फॅमिली ड्रामा चित्रपट ‘सासुरा बडा पिसावाला’तून अभिनयक्षेत्रात पहिले पाऊल टाकले होते. हा चित्रपट खूप यशस्वी झाला आणि अनेक पुरस्कारही जिंकले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयात २२ वर्षांचे अंतर असूनही अमिताभ यांचे खास मित्र होते आदेश; वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी झाला मृत्यू

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’

हे देखील वाचा