Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी सुपरस्टार खेसारी लाल यादवचे ‘चुनरिया ले ली’ गाणं रिलीझ; संपूर्ण वातावरण करून टाकलंय भक्तीमय

सुपरस्टार खेसारी लाल यादवचे ‘चुनरिया ले ली’ गाणं रिलीझ; संपूर्ण वातावरण करून टाकलंय भक्तीमय

भोजपुरी अभिनेता खेसारीलाल यादव हा ट्रेंडिंग स्टारच्या नावानेही ओळखला जातो. त्याच्या हिट म्युझिक व्हिडिओमुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. जर अभिनेत्याचे कोणतेही व्हिडिओ गाणे प्रदर्शित झाले, तर ते यूट्यूबवर ट्रेंड व्हायला सुरुवात होते. अशातच आता खेसारीच्या ‘चुनरिया ले ली’ या नवीन गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्यामुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. अभिनेत्याचे हे गाणे एक भक्तिगीत आहे, जे आई देवीला समर्पित केले गेले आहे.

भोजपुरी गाण्याचा ‘चुनरिया ले ली’चा व्हिडिओ फाल्तू एन्टरटेन्मेंटच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा म्युझिक व्हिडिओ नवरात्रीच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला आहे. नवरात्रीचा पवित्र उत्सव ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, लोक त्याची तयारी करत असताना, भोजपुरी कलाकार देखील व्हिडिओ गाण्यांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले आहेत. या यादीतील हे खेसारीचे पहिले नवरात्री गाणे आहे.

‘चुनरिया ले ली’ गाण्याच्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रक्षा गुप्ता खेसारीसोबत दिसत आहे. हॉट आणि बोल्ड दिसणाऱ्या रक्षाचा या व्हिडिओमधील पारंपारिक लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. यात दिसत आहे की, ती अभिनेत्याला विनंती करत आहे की, देवीला चुनरी अर्पण करण्यासाठी विकत घेऊन या. यासह, ती त्याला देवीच्या श्रृंगाराच्या वस्तू आणण्यास सांगत आहे. हा संपूर्ण व्हिडिओ मस्त आहे. हे पाहिल्यानंतर सकाळचे वातावरण भक्तीमय होत आहे.

व्हिडिओ प्रदर्शित होऊन फक्त थोडाच वेळ झाला आहे आणि त्याला काही तासांमध्ये ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज आणि ५७ हजारांपेक्षाही अधिक लाईंक्स मिळाले आहेत. गाण्याच्या निर्मितीबाबत बोलायचे झाले, तर हे गाणे खेसारी लाल यादवने स्वतः गायले आहे आणि गाण्याचे बोल मुकेश यादव यांनी लिहिले आहेत. त्याचबरोबर गाण्याचे संगीत रोशन सिंगने दिले आहे. दिग्दर्शक पवन पाल आहेत. व्हिडिओचे दिग्दर्शन आणि संगीत सर्व अप्रतिम आहे. गाण्यात, खेसारीचा आवाज चाहत्यांच्या मनात घर करत आहे. हा व्हिडिओ खूप छान असून, याचा आनंद आपण कुटुंबासोबत घेऊ शकता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

-अरबाजने अनिल यांना विचारला सलमानच्या लग्नाचा प्रश्न; अभिनेते म्हणाले, ‘तू तर त्याचा भाऊ आहेस…’

हे देखील वाचा