Thursday, November 21, 2024
Home भोजपूरी धक्कादायक! मुलीच्या फोटोसोबत छेडछाड करणाऱ्यांवर भडकला अभिनेता; म्हणाला, ‘मी इंडस्ट्री सोडतो…’

धक्कादायक! मुलीच्या फोटोसोबत छेडछाड करणाऱ्यांवर भडकला अभिनेता; म्हणाला, ‘मी इंडस्ट्री सोडतो…’

भोजपुरी सिनेसृष्टीत गायन आणि अभिनय या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारे काही मोजकेच कलाकार आहेत. त्यामध्ये खेसारी लाल यादव याचाही समावेश होतो. खेसारीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याचे सिनेमे आणि गाणे सोशल मीडियावर तुफान धमाल करतात. मात्र, सध्या अभिनेता वादाशी झुंज देताना दिसत आहे. नुकतेच असे काहीसे झाले, ज्यामुळे लोकांना त्याचा राग पाहायला मिळाला. त्याने व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे प्रकरण?
खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) मागील काही दिवसांपासून स्वत:ला वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, जेव्हा त्याची मुलगी क्रिती यादव (Kriti Yadav) हिचा विषय आला, तेव्हा तो स्वत:ला रोखू शकला नाही. खरं तर, खेसारीच्या जवळच्या मित्राने लाईव्हवर एका मुलाला चापट मारली होती. त्यानंतर संपूर्ण राजपूत समाज त्याच्याविरोधात उभा राहिला. मात्र, यामध्ये खेसारीच्या मुलीचे नाव घेतले जात आहे. क्रितीचा फोटो आणि तिच्या नावावर वेगवेगळी अश्लील गाणी तयार केली जात आहेत.

खेसारी लाल यादव भावूक
खेसारी लाल यादव याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 29 नोव्हेंबरला लाईव्ह येत म्हटले की, “मी एक कलाकार असल्यासोबतच एक वडीलही आहे. माझ्या मुलीला टारगेट केले जात आहे. जे हत्यार घेऊन खेसारीच्या मागे लागले होते, ते आता कुठे आहेत? माझ्या कुटुंबाने काय बिघडवलंय?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Khesari Lal Yadav (@khesari_yadav)

‘माझ्या कामाचा पाठलाग करा, मुलगी बहिणीने काय बिघडवलंय?’
खेसारीने पुढे म्हटले की, “युट्यूबवरून माझे 200 गाणे एकसोबत डिलीट झाले. सर्वांना खेसारीला संपवायचे आहे. मला कलाकार नाही, वडील बनून बोलायचे आहे. तुमच्या घरी मुलगी- बहीण नाही का? माझ्या कामाच्या मागे लागा, पण कुटुंबाला यामध्ये ओढणे योग्य नाहीये. कोणाच्याही मुलीच्या फोटो आणि नावावर अश्लील गाणे बनवणे योग्य नाहीये.”

‘मी शांत राहणार नाही’
रागाने लाल झालेल्या खेसारीने म्हटले की, तो भोजपुरीला पुढे आणण्यासाठी खूप मेहनत करत आहे. मात्र, जेव्हा कुटुंबाची गोष्ट असते, मुलीची असते, तर मी शांत राहणार नाही.” खेसारीने स्पष्ट शब्दात आपले दु:ख व्यक्त करत म्हटले की, “मी जातीबद्दल बोलत नाही. तरीही माझ्या कुटुंबाला टारगेट केले जात आहे.”

खेसारीचा नवीन व्हिडिओ
नवीन व्हिडिओत खेसारीने इंडस्ट्री सोडण्याविषयी वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, “भोजपुरी भाषेतील चांगल्या सिनेमांसाठी थंडी असो, उन्हाळा असो किंवा मी आजारी असो, तरीही मी काम करतो. माझ्या कामाच्या क्षमतेविषयी तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीत विचारू शकता. जर कुठल्याही व्यक्तीला असे वाटते की, मी भोजपुरीसाठी लायक नाहीये, भोजपुरी समाजासाठी लायक नाहीये, तर मी या भोजपुरी समाजाला सोडून इतर इंडस्ट्रीत निघून जाईल. मला मेहनत करता येते. मी तिथेही स्वत:ला सिद्ध करेल. असे नाहीये की, मी करू शकत नाही, कारण मला करता येते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Khesari Lal Yadav (@khesari_yadav)

खेसारी लाल मागील काही दिवसांपूर्वी त्याच्या एका नवीन गाण्यामुळे चर्चेत आला होता. मात्र, आता या प्रकरणाची सध्या भलतीच चर्चा सुरू आहे. कलाकार या विषयी मौन बाळगून आहेत, तर चाहत्यांनी खेसारीला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. (actor khesari lal yadav controversy bhojpuri actor says he will quit industry for daughter)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
खेसारी लाल यादवचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, आम्रपालीसोबतची केमिस्ट्री वेधतेय लक्ष
पोटची लेक ट्रोल झाल्यावर चिंतेत पडते काजोल? म्हणाली, ‘मी असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा