भोजपुरी अभिनेता खेसारीलाल यादव आजकाल एकामागून एका प्रोजेक्टसाठी काम करत आहेत. सध्या तो त्याच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटाबद्दल चर्चेत आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘बस कर पगली’ या गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर रिलीझ करण्यात आला आहे. खेसारीलालच्या सर्वच गाण्याचे व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडतात. त्याचप्रमाणे या गाण्यालाही रसिकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. हे गाणे खेसारी आणि मेघा शहा यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भोजपुरी गाणे ‘बस कर पगली’चा व्हिडिओ एसआरके म्युझिकच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीझ करण्यात आला आहे. हे गाणे खेसारी लाल आणि मेघा शाह यांच्यावर चित्रित करण्यात आले असून, त्यांच्या या व्हिडिओला सुमारे दीड लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर एक लाखाहून अधिक लाईक्स देखील मिळाले आहेत. खेसारी लाल यादव आणि शिल्पी राज यांनी या गाण्याला त्यांचा सुमधूर आवाज दिला आहे. (Actor Khesarilal Yadav’s new video has been released)
त्याचबरोबर हे गाणे श्याम देहातीने लिहिले असून, या गाण्याला संगीत आर्य शर्माने दिले आहे. त्याचवेळी प्रसून यादवने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. त्याची निर्माती शर्मिला रोशन सिंगने केली आहे. व्हिडिओच्या चित्रीकरणाबद्दल बोलयचे झाले तर, मेघाने यामध्ये अभिनेत्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. जेव्हा ती त्याला फसवते, तेव्हा तो त्या दुःखात खचून जातो. या व्हिडिओमध्ये दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळाली आहे.
जर आपण खेसारीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याच्या आगामी ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासह सहर आफसाने मुख्य भूमिका साकारली आहे. ट्रेलर व्हिडिओमध्ये दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम
-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी