Friday, March 6, 2026
Home मराठी ‘आमच्याकडे सगळं वाजवून मिळेल!’ सोशल मीडियावर रंगलीय किरण गायकवाडने शेअर केलेल्या व्हिडिओचीच चर्चा!

‘आमच्याकडे सगळं वाजवून मिळेल!’ सोशल मीडियावर रंगलीय किरण गायकवाडने शेअर केलेल्या व्हिडिओचीच चर्चा!

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते. मात्र त्या व्यक्तीच्या चांगुलपणाच्या मागे राक्षसी चेहरा देखील असू शकतो, असे सांगणारी मालिका म्हणजेच ‘देवमाणूस’. झी मराठी या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या मालिकेची लोकप्रियता या दिवसांत गगनाला भिडली आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. मालिकेसोबत यातील कलाकारही घरघरात पोहचले आहेत. असाच एक लोकप्रिय अभिनेता आहे किरण गायकवाड, म्हणजेच मालिकेतील ‘डॉ. अजित कुमार देव’.

किरण गायकवाड त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. जो आता इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओ मालिकेच्या सेटवरचा आहे. यातील खास बाब अशी आहे की, ‘देवमाणूस’ मधील सर्व कलाकार यात पाहायला मिळत आहेत. यात सर्वजण ‘काठी नं घोंगडं’ या गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहेत. ऑनस्क्रीन हे कलाकार जितकी गंभीर पात्रं साकारतात, तितकीच मजा ते कॅमेऱ्याच्या मागे करत आहेत.

हा मजेदार व्हिडिओ शेअर करत, किरण म्हणतोय की, “काठी न घोंगडं  “कातळवाडी” बैंजो पार्टी, आमच्याकडे सगळं वाजवून मिळेल. प्रो . प्रा . आमित सावर्डेकर. संपर्क : राजू सावंत. पत्ता : झी मराठी , सोम ते शनी रात्री १०:३० वा.” कॅमेऱ्यात कैद झालेली ही ‘देवमाणूस’ मधील कलाकारांची मस्ती चाहत्यांनाही खूप आवडली आहे. चाहते व्हिडिओ खाली कमेंट करून मालिकेचे तसेच कलाकारांचेही कौतुक करत आहेत. मालिकेतील सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव ही पात्रं सध्या रसिकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत.

अभिनेता किरण गायकवाड यापूर्वी ‘लागीर झालं जी’ मध्ये दिसला होता. यातील त्याचे पात्र विशेष गाजले. नकारात्मक भूमिका असूनही, त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले. आता त्याचे ‘देवमाणूस’ मधील पात्र देखील खूप पसंत केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा