‘बिग बॉस १३’चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने २ सप्टेंबर रोजी अचानक जगाला निरोप दिला. या धक्क्याने केवळ सिद्धार्थच्या जवळच्या लोकांनाच नाही, तर संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का दिला आहे. त्याचवेळी सिद्धार्थच्या मृत्यूनंतर माध्यमांनीही या संपूर्ण घटनेला कव्हर केले. या दरम्यान अनेक वेळा गोष्टी नियंत्रणाबाहेर गेलेल्या दिसल्या. त्याचवेळी यासंदर्भात, अभिनेत्री क्रिती सेननने अशा माध्यम संस्थांना त्यांच्या मूर्खपणाच्या वृत्ताबद्दल फटकारले आहे.
शुक्रवारी ओशिवारा स्मशानभूमीत सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दरम्यान, इंडस्ट्रीतील अनेक कलाकार देखील त्याला अंतिम निरोप देण्यासाठी तेथे उपस्थित होते. या दरम्यान, अनेक मीडिया कॅमेरे सतत या कलाकारांच्या जवळ जाताना दिसले. गौहर खान, कुशाल टंडन, राहुल वैद्य यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही यासंदर्भात आपल्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
क्रिती सेननने फटकारले
त्याचवेळी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करताना अभिनेत्री क्रिती सेननने लिहिले की, “मीडिया, फोटोग्राफर आणि ऑनलाइन पोर्टलची असंवेदनशीलता पाहून माझे हृदय तुटले आहे. लज्जास्पद, ही बातमी नाही किंवा हे कोणतेही मनोरंजन नाही. मर्यादेत जगायला शिका. काही संवेदना सोडा. अंत्यसंस्कार कव्हर करणे थांबवा. जी लोक आपल्या माणसाच्या जाण्याने धक्यात आहेत, त्यांचा पाठलाग करणे थांबवा. तुम्ही हे सर्व का करत आहात? फक्त काही पोस्टसाठी? एक भूमिका घ्या आणि हे फोटो पोस्ट करू नका. हृदयद्रावक लिहून खोट्या भावना दाखवू नका.”
क्रितीची बहीण नुपूरनेही व्यक्त केली नाराजी
याशिवाय क्रितीची बहीण नुपूरने देखील माध्यमांना फटकारले आहे. तिने लिहिले की, “गेल्या २४ तासांमध्ये मी काही माध्यमांच्या व्यक्तींचे अत्यंत असंवेदनशील वर्तन पाहिले आहे. फक्त काही पोस्ट्साठी एवढी धडपड आणि असंवेदनशीलता दाखवत आहे की, आपण कसे माणूस झालो आहोत.” अशा शब्दांत तिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा